सातार्डा येथे आढळला दुर्मिळ 'ग्रीन शॅमेलियन'

पत्रकार संजय पिळणकर यांनी दिले जीवदान
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 18:19 PM
views 256  views

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा येथे भर रस्त्यात एक हिरव्या रंगाचा सरडा रांगत जात होता.यावेळी रस्त्यावरून बरीच वाहने ये-जा करत होती.त्यावेळी तेथून प्रवास करतांना पत्रकार संजय पिळणकर यांच्या ती बाब लक्षात येताच त्यांनी वाहनांना थांबवून त्या दुर्मिळ सरड्याला नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. यावेळी ये - जा करणाऱ्या वाहन धारकांनी वाहने थांबवून संजय पिळणकर यांना सहकार्य केले.

दरम्यान त्या दुर्मिळ सरड्याचा व्हिडीओ व फोटो वनधिकारी क्षीरसागर व नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचे उपाध्यक्ष डुमिंग डिसोझा यांना पाठवला असता, त्यांनी दुर्मिळ जातीचा  'ग्रीन शॅमेलियन' जातीचा सरडा असून त्याला 'फरुड' असेही म्हटले जात असल्याबाबत पुष्टी दिली.