सावंतवाडी : भाजपने दावा केलेल्या असनिये सरपंचांसह ठाकरे गटाच्या आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. भाजपसह ठाकरे गटाला शिंदे गटाने धक्का दिला असून तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या पुढाकारातून हा प्रवेश पार पडला.
असनियेतील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला होता. तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांच्या माध्यमातून हा प्रवेश करण्यात आला. शिंदे गटात केलेल्या प्रवेशामुळे भाजपला हा धक्का मानला जात आहे.
सरपंच रेश्मा सावंत, उपसरपंच साक्षी सावंत, निधी नाईक, दर्शना दामले, भरत सावंत, राकेश सावंत, संदीप सावंत, आनंद ठिकार, जितेंद्र सावंत यांसह अनेकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील अशोक नाईक, प्रशांत कोरगावकर, अशोक खोबरेकर, वसंत मेस्त्री, वासुदेव गडेकर, वामन मठकर तर तळवणेतील माजी सरपंच मिलिंद कांबळी, सतीश रेडकर, तिरोडा येथील माजी सरपंच अनिल केरकर, निलेश सावंत, कृष्णा केरकर, पुरूषोत्तम केरकर आदींनी प्रवेश केला. तर अॅड. निता सावंत - कविटकर यांची बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, अनारोजीन लोबो, रघुनाथ रेडकर, गजानन नाटेकर, सचिन वालावलकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.