प्रश्न साटेली-भेडशील प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पणाचा

उद्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपोषण
Edited by: संदीप देसाई
Published on: February 19, 2023 20:36 PM
views 194  views


दोडामार्ग:

तालुक्यातील साटेली - भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकार्पण केल्यानंतरही त्यात जिल्हा आरोग्य विभाग रुग्णसेवा सुरू करत नसल्याने गेले ४ दिवस तेथ सुरू असलेलं धरणे आंदोलन आता उद्या 20 फेब्रुवारीपासून बेमूदत उपोषण आंदोलन होणार आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली आहे. याबाबतचे लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बाबुराव धुरी यांनी दिले आहे.

या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत गेल्या ४ वर्षात बांधकामाच्या प्रक्रियेत आहे. एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने बांधण्यासाठी तब्बल चार वर्षे ग्रामीण भागातील जनतेला अद्यावत रुग्ण सेवा देण्यापासून वंचित ठेवण्यासारखा आहे. या बेजबाबदारपणाचा कळस म्हणून आता सुसज्ज इमारत पूर्ण होऊ नये प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज त्या इमारतीत सुरू केलेलं नाही. आणि म्हणूनच आम्हाला लोकांच्या हितासाठी टोकाचा निर्णय घ्यावा लागला, मात्र तरीही आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासनाला जाग येत नसल्याने लोकांच्या हितासाठी उद्या सोमवार 20 फेब्रुवारीपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तेथील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणीच बेमुदत उपोषण सुरू करणार आहे.  व त्यास पूर्णतः जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा श्री धुरी यांनी दिला आहे. केंद्रे ते दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय असे 32 किलोमीटरचा अंतर आहे, अशावेळी एखाद्या व्यक्तीला सर्पदंश सारखा गंबिर अपघात झाल्यास वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला जीवही गमवावा लागतो. इतकच नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती अभावी या तालुक्यातील निम्म्या गावांच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी धुरी यांनी केली आहे.