वैभववाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विकास संकल्पनेतून वैभववाडी येथील प्राची तावडे यांची 'ड्रोन दीदी' म्हणून निवड झाली आहे. मुंबई येथील आठ दिवसांच्या प्रशिक्षणातून त्यांची निवड झाली. यातूनच जिल्ह्यातील त्या पहिल्या 'ड्रोन दीदी ठरत्या असून त्या बचत गटांच्या महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण देणार आहेत.
पिकांवर विविध कीटकनाशकांची फवारणी सुलभ पद्धतीने करता यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करता यावी, यासाठी ड्रोनद्वारे फवारणीची संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी पुढे आणली आहे. या उपक्रमात महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. ड्रोन चालवण्यासाठी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांना 'डोन दीदी महणून संबोधले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वैभववाडीच्या प्राची तावडे यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. मुंबईत आठ दिवसाचे प्रशिक्षण घेऊन त्या जिल्ह्यातून एकमेव 'ड्रोन दीदी ठरल्या आहेत. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.जिल्हायातील आंबा, काजू बागायतदारांसाठी ही संकल्पना फायदेशीर ठरणार आहे.