
संदीप देसाई | सिंधुदुर्ग : उबाठा सेनेतून शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचं सावंतवाडी मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार स्वागत झालं. विशेष म्हणजे, हे स्वागत ज्या मतदारसंघात झालं जिथे तेली यांनी याआधीच शिंदे गटाचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या स्वागत सोहळ्याला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. मात्र, दीपक केसरकर यांची अनुपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली. राजन तेली यांच्या पुनरागमनाने जरी शिवसेनेच्या संघटनांत नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र निर्माण झालं असलं, तरी हा प्रवेश ‘जिल्ह्यातील अंतर्गत समीकरणां’ना नवे वळण देणारा व सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा नवी वावटळ उठवणारा आहे.
उबाठा सेनेतून बाहेर पडलेले माजी आमदार राजन तेली यांनी अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश करत पुन्हा राजकीय मैदानात दमदार पाऊल टाकलं. सावंतवाडी मतदारसंघा बरोबरच जिल्ह्यात आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दमदार स्वागत सोहळ्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. विशेष म्हणजे, या स्वागताची सुरवात ज्या मतदारसंघात झाला जिथे राजन तेली यांनी गेल्या निवडणुकीत याच शिंदे शिवसेनेच्या उमेदवार व आताचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने ‘राजकीय समीकरणांचा पट’ पुन्हा एकदा नव्याने आखला जात असल्याचं चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालाय. असं असलं तरी निलेश राणेंची हि मुत्सद्दी चाल खेळून मित्रपक्ष भाजप व विरोधक उबाठा सेनेलाही एक प्रकारे दे धक्का दिलाय.
शिवसेनेला आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आपलं संघटन मजबूत करण्यासाठी हि खेळी मोठी फायदेशीर ठरणार हे निश्चित आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजपा जिल्ह्यात ‘मोठा भाऊ’ म्हणून वावरत असताना, शिंदे शिवसेनेला आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी राजन तेलींचा अनपेक्षित शिंदे शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. त्यामुळे ही चाल केवळ स्वागत सोहळ्यापुरती मर्यादित नसून, ती नव्या राजकीय रणनीतीचा आराखडा म्हणूनही याकडे पाहायला हरकत नाही. “नारायण राणे यांचा उजवा हात आज माझ्या डाव्या बाजूला आला आहे.” असं सांगत या वाक्यातून निलेश राणे यांनी राजन तेलींच्या राजकीय जवळिकीला मान दिला, आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सत्तासमीकरणात आपलं वर्चस्व यावेळी दाखवलं. राजन तेली हे जिल्ह्यातील अनुभवी, प्रशासकीय जाण असलेले आणि चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात. दीर्घ राजकीय कारकीर्द, संघटन कौशल्य आणि सामाजिक संपर्क या तिन्ही गुणांमुळे त्यांचा पक्षप्रवेश हा शिंदे शिवसेनेला नवी ऊर्जा देणारा ठरू शकतो. इतकच नव्हे तर राणे यांनी तेलींच्या प्रवेशाचं कौतुक करत म्हटलं की, “जिल्ह्यातील टॉप पाच अनुभवी राजकीय मेंदूत तेलींचा समावेश होतो. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद वाढली आहे.” यावरूनच आगामी काळात शिंदे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशी वाटचाल करण्याच्या इराद्यात आहे हे हहि अधोरेखित होत. मात्र, शिंदे शिवसेना प्रवेश झालेमुळे तब्बल वर्षानंतर सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्या कार्यालयातच राजन तेली यांचे स्वागत झाले. मात्र, या स्वागताला आमदार दीपक केसरकर अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणूक काळात तेली यांनी केसरकर यांच्यावर निष्क्रिय आमदार म्हणून अनेक आरोप केले होते. त्यामुळे केसरकर तेली यांच्याशी जुळवून घेतील का ? हा प्रश्न अनेकांना होता आणि आहे. पण यावर आमदार निलेश राणे म्हणाले कि, “केसरकर यांनी स्वतः तेलींच्या प्रवेशाचं स्वागत केलं असून त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल,” तर या प्रवेशावर यापूर्वीही केसरकर यांनी भाष्य केल होत. कि, कितीही खोटे आरोप केले तरी सत्य हे सत्य असतं, त्यामुळे त्यांचा द्वेष आंपण का करावा. मी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केलेला नाही. मुळात तेली यांचा सावंतवाडी हा प्रदेश नाही, आणि ज्या भागातून ते येतात त्या भागाचं नेतृत्व निलेश राणे करतात. त्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केलीली आहे. असं म्हणत त्यांनी अधिक बोलण टाळल होत. आणि आजही ते उपस्थित नव्हते. त्यांची आजची हि अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. हे जरी वास्तव असल तरी राजन तेलींचा प्रवेश म्हणजे फक्त पक्षबदल नाही, तर तो जिल्ह्यात शिंदे शिवसेनेतील वेगळ्या मोर्चे बांधणीचा नवा अध्याय ठरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेत राणे, केसरकर आणि तेली या तिघांच्या समन्ववयाच समीकरण नेमकं कसं जुळतं हे पाहण सुद्धा महत्वाच ठरणार आहे.