पत्रकारांच्या पीचवर राजकारण्यांची फटकेबाजी !

अखेरच्या सामन्यापर्यंत चुरशीची लढत !
Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2023 17:01 PM
views 269  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित इडमीशन पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पत्रकारांच्या क्रिकेटच्या पीचवर राजकारण्यांनी जोरदार फटकेबाजी केली. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी मनोगत व्यक्त करताना संजू परब म्हणाले,  पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील संबंध गेली अनेक वर्षे चांगले असल्यामुळे सामाजिक जीवनात त्याचा फायदा झाला. आज पत्रकारांच्या क्रिकेट सामन्यात सहभागी होता आलं यांचा आनंद आहे असं मत संजू परब यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धाना शुभेच्छा दिल्या. यानंतर क्रिकेटच्या पीचवर माजी नगराध्यक्ष संजू परब, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांनी जोरदार फटकेबाजी केली. तर भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी गोलंदाजी केली. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धांना प्रारंभ झाला. 


दरम्यान, भाजप युवा नेते विशाल परब, क्रेडाईचे नीरज देसाई, शरद सावंत, श्री. खोर्जुवेकर, माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, अंकूश जाधव, कॉंग्रेसचे समीर वंजारी, महेंद्र पेडणेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.


यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, रमेश बोंद्रे, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, एडमिशनचे संदीप नाटलेकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, अँड. संतोष सावंत, राजू गावडे, प्रदीप सावंत, विलास कुडाळकर, अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, संतोष परब, उमेश सावंत, मोहन जाधव, रामचंद्र कुडाळकर, हेमंत मराठे, राजेश मोंडकर, सचिन रेडकर,मयुर चराठकर, दीपक गांवकर, संदिप देसाई, देवयानी वरसरक, भरत केसरकर, समीर सावंत, दिपेश परब, प्रा. रूपेश पाटील,  विनायक गांवस, प्रसन्न गोंदावळे, विशाल पित्रे, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, आनंद धोंड, शैलेश मयेकर, लुमा जाधव, स्वप्नील उपरकर, महेश चव्हाण, भूवन नाईक, राजू तावडे, मदन मसुरकर, अनुजा कुडतरकर, निखील माळकर, अनिल भिसे, जतिन भिसे, नागेश पाटील, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी आदींसह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार उपस्थित होते.