Narayan Rane ; संघर्षातून उभा राहिलेला नेता !

खुद्द पंतप्रधान मोदींनी वाढदिनी नारायण राणेंचं केलं कौतुक
Edited by: ब्युरो
Published on: April 10, 2023 17:13 PM
views 612  views

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेले नारायण राणे सध्या भाजपचे नेते आणि केंद्रात मंत्रिपदी आहेत. आज नारायण राणेंचा वाढदिवस. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नारायण राणे यांचं कौतुक केलंय. स्थानिक पातळीवरील संघर्षातून उभा राहिलेला नेता, अशा शब्दात मोदी यांनी राणे यांचं कौतुक केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी त्यांचं कौतुक केलंय.

PM मोदींनी काय केलं ट्वीट ?

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मद्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. स्थानिक पातळीवरून उदयास आलेले, लोकप्रिय नेते आणि प्रशासक अशी त्यांची स्तुती करण्यात आली आहे. तसेच MSME क्षेत्राला गती देण्यासाठी ते भरपूर मेहनत घेत आहेत. त्यांना दीर्घ तसेच निरोदी आयुष्यासाठी शुभेच्छा.. अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी इंग्रजीत ट्विट केलंय.