दोडामार्ग : पडवे माजगाव येथील श्री देवी माऊली दुग्ध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थेनं आयोजित केलेल्या पशू चिकित्सा शिबिर व पशू संवर्धन अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांना मोठा प्रतिसाद लाभला.
पडवे माजगाव हे गाव दुग्ध उत्पादनात एक पाऊल पुढे टाकत असताना यासाठी तेथील श्री देवी माउली दुग्ध उत्पादक संस्था विशेष मेहनत घेत आहे. याच अनुषंगाने गावात पशुधन अजून वृध्दींगत व्हाव, दुग्ध उत्पादन करीता नागरिक व पशुपालक यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी या संस्थेच्या पुढाकाराने व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नुकतेच एक दिवसीय पशू चिकित्सा शिबिर संपन्न झाले.
यावेळी पशू चिकित्सा व्यवस्थापक डॉ. पी.जे. साळुंखे, डॉ. ए. डी. गायकवाड, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रेडकर, सरपंच सौ. नयना देसाई, पशू दुग्ध संकलन अधिकारी अनिल शिर्के, पशू विकास अधिकारी डॉ. भगवान गावडे, डॉ. संसारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मृणाली परिट, डॉ. मलिक, डॉ. वालावलकर, डॉ. मधुकर दाभाडे, डॉ. चिन्मय पटकारे, डॉ. किरण टिकटे, डॉ. यशवंत वझरेकर, डॉ. तांडेल, डॉ. कुडाळकर आदींना या शिबिरात निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी. दुग्व्यवसाय व उत्पादक व पशुपालक शेतकरी यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. तर याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धात प्रथम आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांना सरपंच नयना देसाई व अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे..
वासरू संगोपन स्पर्धा
म्हैस वासरू
१. साबाजी तातोबा देसाई
२. मंजुषा मुकुंद देसाई
३. उदय भगवान देसाई
गाय वासरू
१. उदय पुंडलिक देसाई - प्रथम,
२. अक्षय दत्ताराम कदम - द्वितीय,
३. रवींद्र अमृत देसाई - तृतीय
उत्कृष्ट जातिवंत मुऱ्हा म्हैस
१. उदय भगवान देसाई
जास्तीत जास्त दूध (१ एप्रिल २१ ते ३० मार्च २२)
१. उज्वला उदय देसाई - प्रथम
२. प्रल्हाद सखाराम देसाई - द्वितीय
३. नारायण भगवान देसाई - तृतीय
गाय दूध स्पर्धा
अक्षय दत्ताराम कदम - प्रथम
दुर्वा दीपक देसाई - द्वितीय
ज्ञानेश्वर रामचंद्र शिंदे - तृतीय