
दोडामार्ग :
तळेखोल येथील गवस ब्रदर्स स्पोर्ट क्लबच्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 5 मार्च यादरम्यान तळेखोल ग्राउंड वर 'सातेरी चषक' ही स्पर्धा होणार आहे. डबल 51 हजार रुपयांचा पहिलं पारितोषिक असलेल्या या स्पर्धेत गोवा व महाराष्ट्रातील संघांना सहभागी होता येणार आहे.
उद्या एक महत्वाची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व प्रमुख पाहुणे म्हणून पर्ये येथील सामाजिक कर्यकर्त अंकुश मांद्रेकर, शिवसेना करकर्ते दशरथ फटी गवस, फटी गवस, सरपंच वंदना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिवसेना कार्यकर्ते अल्कोन कन्स्ट्रक्शन, अल्कोपावे, कासा आमोरा मंगलंम, शिवसेना कार्यकर्ते रोहन गवस, राजेंद्र गवस, युवराज गवस, पप्पू गवस, राज गवस, सुरेश गवस, विठोबा झोरे आदी मान्यवर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत विजेत्या संघास 51000 उप विजेत्या संघास 26000 व रानरफ संघासाठी 6000 रुपये बक्षीस मिळणार आहे. तर सर्व सामन्यात सामनावीर साठी व फायनल सामन्यात बेस्ट बेस्टमन व बॉलर यांच्यासाठी ट्रॉफी मिळणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी योगेश गवस 7722042267 व राजू गवस 8468952180 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गवस ब्रदर्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.