ब्युरो न्युज : जागतिक महिला दिनानिमित्त माधवबागतर्फे थायरॉईड व ईसीजी तपासणी फक्त 199 रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. ही तपासणी दिनांक 9 ते 10 मार्च या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत असेल.
हृदयाचे ठोके वाढणे, अति प्रमाणात वजन वाढणे, वजन कमी होणे, थकवा, कोरडी त्वचा, अति प्रमाणात घाम, मासिक पाळीमध्ये अनियमितता, गळ्याच्या खालच्या बाजूला सूज किंवा उंचवटा, डोळे फुगीर दिसणे, केस गळणे, लैंगिक क्षमतेवर परिणाम, अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची या अंतर्गत खास तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये थायरॉईड तीन चाचण्या करण्यात येतील. याचा एकूण खर्च 1000 असला तरी या दोन दिवशी फक्त 199 रुपयेमध्ये या तपासण्या करण्यात येतील. गरजू रुग्णांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबागतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क :
कणकवली - 9373183888
कुडाळ - 9011328581
सावंतवाडी - 7774028185