ब्युरो न्यूज : जर तुम्हाला वाटेत वॉशरूममध्ये जाण्याची गरज असेल तर काळजी करू नका, कारण इंडीयन सिरीज कायदा 1887 नुसार तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये (लहान किंवा 5 स्टार) जाऊन मोफत वॉशरूम वापरू शकता. कोणत्याही हॉटेल कामगाराने तुम्हाला थांबवले तर त्या हॉटेलचा परवाना रद्द होऊ शकतो.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाबा खाजगी मालमत्ता असूनही सार्वजनिक सेवांच्या श्रेणीत येतात. घटनेच्या कलम १५ (२) अन्वये कोणत्याही नागरिकाला लिंग, जात, धर्म, भाषा, पेहराव किंवा प्रदेश या आधारावर वरील सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापासून रोखता येत नाही. कोणत्याही पेट्रोल पंपावर तेलाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासण्यासोबतच खालील सुविधा मोफत मिळणे हा तुमचा हक्क आहे. वाहनात मोफत हवा, पिण्यासाठी मोफत व स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, दुखापत किंवा जखमेच्या बाबतीत प्रथमोपचार पेटी.
जर तुम्ही पेट्रोल पंपावर गेलात आणि तुम्हाला यापैकी कोणतीही सुविधा मिळत नसेल, तर तुम्ही टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ३५५५ वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता, याशिवाय कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन तक्रारही करू शकता.