मुंबई: इलाका तुम्हारा है तो धमाका हमारा है! आखिर तुम्हारे इलाके मै हमने धमाका कर दिखाया है! तुमचा इलाका असला तरी आम्ही धमका करू शकतो याप्रमाणे भाजपचे युवा नेतृत्व तथा विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भलेमोठे होल्डिंग मुंबईत झळकवले आहेत.
माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्चला आहे.या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल परब यांनी हे भलेमोठे बॅनर मुंबई मध्ये लावले आहेत. विशेषत शिवसेनेचा बालेकिल्ल्यात हे बॅनर झळकल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मातोश्री व शिवसेना भवना समोरच हे बॅनर लागले आहेत. त्यामुळे निलेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेले विशाल परब यांनी मातोश्रींच्या अंगणातच पुन्हा एकदा हे बॅनर लावत धमाका केला आहे. याआधी नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेत अशाच पद्धतीने बॅनर लावत धमाका केला होता. त्यामुळे विशाल परब हे जोरदार चर्चेत आले होते. आज अशाच पध्दतीने मुंबई सह तळकोकणात निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणारे हजारो बॅनर लावत विशाल परब यांनी एकच प्रकारचा धमाका केला आहे.