चिपी विमानतळास बॅ.नाथ पैंचे नाव द्या !

सुप्रिया सुळेंनी वेधल ज्योतिरादित्य सिंधियांच लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2023 19:35 PM
views 291  views

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथील चिपी  विमानतळास थोर स्वातंत्र्यसेनानी  बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बॅ नाथ पै यांचे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिल्यानंतर त्यांनी एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपला ठसा उमटविला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे नाव येथील विमानतळास देऊन आपल्या भूमीपुत्राच्या स्मृती जतन करणे सिंधुदुर्गवासियांना शक्य होईल. याबाबतचा ठराव महाराष्ट्र शासनाने केला असून १ फेब्रुवारी २०२३ रोजी तो केंद्र सरकारकडे देखील पाठविला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी  या प्रस्तावावर सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घ्यावा ही अशी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.