
प्रासंगिक : लवू म्हाडेश्वर
नितेश राणे पालकमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भावी पिढी बरबाद करणारी कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. असे सांगितले. हे सांगताना "हलक्यात घेऊ नका" असा इशा राही दिला. मात्र या इशारयाकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील अवैध धंदे तसेच चालू राहिले." हलक्यात घेऊ नका" याचा अर्थच न समजल्याने नेहमीप्रमाणे वागणाऱ्या अधिकारी आणि प्रशासनाला पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतःच जुगार मटका अड्या वर धाड टाकत "हलक्यात घेऊ नका" याचा जणू अर्थच समजून सांगितला आहे. यामुळे आता तरी पोलीस प्रशासनासह सर्वांनाच या वाक्याचा अर्थ चांगलाच समजला असेल.
२०२४ मधील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कणकवली देवगड या मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर ज्यांचे नावलौकिक आहे असे नितेश राणे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पालकमंत्री झाल्यानंतर ज्या सिंधुदुर्गतील जनतेने आपल्यावर एवढा विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलं आणि ज्या पक्षाने आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली या सर्वांबाबत कृतज्ञता व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आदर्श जिल्हा बनविण्याचे स्वप्न पाहिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय हृदयाशी ठेवून मार्गक्रमण सुरू ठेवलं आहे. हे मार्गक्रमण करत असतानाच जिल्हास्तरावरील सर्व खात्याचे प्रमुख आणि सर्वात कायदा व सुव्यवस्था राखणारी पोलीस यंत्रणा यांना समोर बसवून त्यांनी जिल्ह्यातील भावी पिढी बरबाद होईल किंवा त्या पिढीचे नुकसान होईल अशा कोणत्याच गोष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालणार नाही असे स्पष्टपणे बजावले होते. हे सुचवतानाच जिल्ह्यात चालणारे अवैध जुगार, मटका, गोवा बनावटीची बिगरपरवाना दारू, याचबरोबर आमली पदार्थ, वाळू तस्करी अशा कोणत्याच गोष्टी चालणार नाही असे ठणकावले होते. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रशासनालाही अनेकदा "मला हलक्यात घेऊ नका" असा गर्भीद इशाराही दिला होता. मात्र तरीही पालकमंत्री काय नेहमीप्रमाणेच सूचना देऊन गप्प राहतील, अशाच प्रकारे सूचना देऊनही त्या सूचनाना पोलीस प्रशासनासह अधिकाऱ्यांनाही हलक्यात घेण्याची चूक केलीच. पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितल्यावर हो करतो, आमच लक्ष आहे, आम्ही असा कोणताच प्रकार चालू देणार नाही असे सांगत अधिकारी वेळ मारून दिवस पुढे ढकलत होते. परिणामी प्रत्यक्षात अशा जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याच प्रकारांवर त्यांना अपेक्षित असा आळा बसताना पालकमंत्री नितेश राणे यांना दिसत नव्हता. त्यानंतर तर बऱ्याच वेळा पालकमंत्री नितेश राणे यांनी काहींची अशा धंद्यात गुंतलेल्या धेंड्याची नावेही पोलीस अधिकारी यांना देत धाड टाका, कारवाई करा असे बजावले होते. मात्र तरीही कारवाई झाली नाही, पालकमंत्री यांच्या "हलक्यात घेऊ नका" या शब्दाचाच अर्थ न समजल्याने की जाणून बुजून समजावून न घेतल्याने पोलीस यंत्रनेचा ढिम्म कारभार कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांना सतावत होता. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनाचं मठ्ठ बनलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी स्वतःचं मैदानात उतरावं लागलं.
आणि तो दिवस गुरुवारी कणकवलीत उजाडला. मैदानात उतरतानाही एखाद्या चित्त्याप्रमाणे झेप घालत पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत दिवसाढवळ्या म्हणजेच सायंकाळी चार वाजता धाड टाकत एवढी वर्ष बेमालून पणे चालू असलेल्या मटका अड्ड्याचा परदाफाश केला. आणि जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणाच्या, किंबहुना एस.पी च्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या गृहखात्याकडे कोणी बोट दाखवेल आणि जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्यशी कोणी खेळत असेल तर संयम बाळगणारा हा पालकमंत्री नाही हे कृतीतून नितेश राणे यांनी दाखवून दिलं. या धडक ऍक्शननंतर गांधारीच्या भूमिकेत असलेली पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. काय घडले आणि काय घडते हेच या यंत्रणेला समजायला तयार नाही. ज्यावेळी समजले त्यावेळी मात्र या पोलीस यंत्रणेच्या पायाखालील वाळू सरकुन गेली होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेतील घेवारी याच्या मटका अड्डयावर धाड टाकत तब्बल पावणेतीन लाखाची रोकड, आणि मटका जुगारासाठी लागणारे अन्य लॅपटॉप व अन्य साहित्य पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यात तब्बल १२ संशयित आरोपींही ताब्यात घेण्यात आले.
खरं तर कणकवली सारख्या बाजारपेठेमध्ये एवढा मोठा मटका अड्डा चालतो, आणि हे तेथील पोलिसांना माहीत नाही आणि ते पालकमंत्र्यांना समजते हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हेगारीमध्ये राज्यात खूप खाली आहे. या जिल्ह्यात खून, दरोडे आदी प्रकार नाहीत. मात्र बेकायदेशीर व सामाजिक स्वास्थ बिघडवणारे मटका, जुगार, अवैध दारू धंदे, अमली पदार्थ विक्री, छुपा वेश्या व्यवसाय अजूनही सुरू आहेत. पालकमंत्री याप्रशनी गंभीर असूनही खाकीतील काही अपप्रवृत्तीच्या वरद हस्ताने या धंद्यांना खतपाणी मिळत होते. मात्र आता पालकमंत्री नितेश राणे यांनी दाखवलेली आक्रमक भूमिका या गोष्टीना आळा बसवेल आणि जिल्ह्यात यापुढे मोठे गुन्हे घडणार नाहीत, अशी आशा बाळगायला हरकत नाही. पोलीस यंत्रणेने नीटनेटके नियोजन करून अशा गोष्टींवर आळा घालणं त्यांचं कर्तव्यच आहे. मात्र असं न करता या गोष्टी तशाच चालू राहतात आणि या बंद करण्यासाठी थेट पालकमंत्र्यांना मैदानात उतरून धाड टाकावी लागते, हे खरे म्हणजे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे सपशेल अपयश म्हणावं लागेल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, वाळू तस्करी, अमली पदार्थ याचबरोबर जिल्ह्यातील मुलीही गायब होत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर घरफोड्या, दुकान दरोडे सुरू आहेत. तर खुलेआम बाजारांमध्ये पाकीट मारी सुरू आहे. मात्र याकडे पोलीस यंत्रणेच लक्ष दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी स्वतः मटका अड्ड्यावर धाड टाकून पोलीस यंत्रणेला जो काय इशारा देणे आवश्यक आहे तो दिलाय. "मला हलक्यात घेऊ नका" म्हणजे काय याचा प्रत्यक्ष दाखलाचं पोलीस यंत्रणाना दिलाय. त्यामुळे रस्त्यांवर पर्यटकांच्या गाड्या अडवून त्यांच्याकडून काही चिरीमिरी मिळविणे, तसेच सर्वसामान्य लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवून त्यांना धमकावणारी ही यंत्रणा आता तरी पालकमंत्री यांचा थेट ग्राउंडवरून मिळालेला इशारा गांभीर्याने घेते का हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.