16 वर्षांची परंपरा...पुरुषांची वटपौर्णिमा !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 10, 2025 19:59 PM
views 180  views

कुडाळ : वटपौर्णिमा हा सण महिलाच साजरा करतात असे आतापर्यंत समजले जात होते. सात जन्म हाच पती मिळावा ही इच्छा मनी ठेवून वडाचे पूजन केले जाते. तर संपूर्ण दिवस उपवासही केला जातो. मात्र, कुडाळ गवळदेव येथे मागील १६ वर्षे वटपौर्णिमेचा हा सण पुरुष साजरा करीत आहेत. वडाच्या झाडाला पुरुष वर्गाकडून सात फेऱ्या मारत ही आगळीवेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी करण्यात येते. 

हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव भागात पुरुषही अनोखी वटपौर्णिमा साजरी केली. या पुरुष मंडळींनी विधीवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली. तसेच वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या. पत्नी आपल्या पतीला जसे दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करता तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य मिळावे यासाठी पूजा केली, असे नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी सांगितले.