गुढी पाडव्याआधी घरात हे बदल करा ; घरात नांदेल भरभराट

Edited by: ब्युरो
Published on: March 21, 2023 11:02 AM
views 234  views

Gudi Padwa 2023 : भारतीयांसाठी गुढी पाडवा हा महत्वाचा सण आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. हिंदू परंपरेनुसार भारतात प्रत्येक सणाच्या खास रिती आहेत. तेव्हा यंदा गुढीपाडव्याआधी घरात हे महत्वपूर्ण बदल केल्यास घरात सुखसमृद्धी राहीलच, सोबतच पैशांचीही भरभराट होईल. घरात सकारात्मक उर्जा संचारेल.

देवघर सजवा

देवघर कायम ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल.

गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक उर्जा वाढविण्याकरिता देवाला ताजी फुले वाहावी. त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडीत मुर्ती, निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या. देवघरात स्वस्तिक, कळस, ॐ चे चिन्ह लावा. देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा. तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा.

घरालाही सजवा

घरातील नकारात्मक उर्जा बाहेर काढण्यासाठी घराला सजवा. घराला नवीन रंग द्या. ते शक्य नसल्यास घरातील सगळया तुटक्या वस्तू, आणि सामान घराबाहेर काढा. खोलीचे दरवाजे विचित्र आवाज करणारे असतील तर ते लगेच बदला. घरातील तुळस खराब झाली असेल तर घरात नवीन तुळस लावा.

स्वयंपाकघराची स्वच्छता जपा

घरात नेहमी अन्न धान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे. याने घराची सुरक्षा वाढते. घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य, पिठ खराब झाले असल्यास किंवा त्यात किड पडली असल्यास ते स्वच्छ करावे. स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी. फ्रिजची स्वच्छता ठेवावी. स्वयंपाकघर स्वच्छ राहील्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील.

घरातील स्वच्छता राखा

शास्त्राप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्ताआधीच घरातील केर काढा. गुढी पाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक उर्जेचा वास राहील. घरात सकारात्मक उर्जा आकर्षित करण्यासाठी स्वच्छतेच्या पाण्यात जाड मिठ घालावे.