गावातून एकतरी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा घडवा

विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांचं आवाहन
Edited by: भरत केसरकर
Published on: April 05, 2023 15:28 PM
views 597  views

कुडाळ  : तुमच्या गावातून एकतरी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा घडवा. विशाल सेवा फाउंडेशन त्या खेळाडूला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. मला फक्त असे घडलेले खेळाडू बघायचे आहेत. बाव गावातील युवकांना एक भावनिक आवाहन विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांनी केले. भारतीय जनता पार्टी बाव कुडाळ आयोजित बक्षीस वितरण व सत्कार सोहळ्याच्या वेळी विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा अध्यक्ष व भाजप चे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विशाल परब व्यासपीठावरून बोलत होते.

   यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुका भाजप अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, कुडाळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिपक नारकर,भाजप युवा मोर्च्या कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, श्रीपाद तवटे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी बावच्या वतीने विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाव गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.