'कोकणसाद LIVE'च्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर !

वर्धापनदिन सोहळ्यात होणार बक्षीस वितरण !
Edited by: जुईली पांगम
Published on: February 15, 2024 13:47 PM
views 437  views

सिंधुदुर्ग : कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE प्रस्तुत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक लिमिटेड प्रायोजित आणि कॅमलिन आणि श्रीराम बोअरवेल सहप्रायोजित गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या स्पर्धेचा निकाल माघी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर जाहीर करण्यात येत आहेत. या स्पर्धेत कोणी बाजी मारलीय पाहूयात...

कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE  च्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रायोजित  कॅमलिन आणि श्रीराम बोअरवेल सहप्रायोजित या स्पर्धेचं हे सलग 10 वं वर्ष होतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. माघी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर हे निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होतोय. एका पेक्षा एक हटके देखावे यात स्पर्धकांनी साकारले होते. मात्र यात बाजी मारली ती कुडाळ माणगाव येथील आनंद मेस्त्री ( मोपकर ) यांनी. आनंद मेस्त्री प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. वेंगुर्ला कर्ली येथील रुपेश मळेकर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. वैभववाडीतील साळुंखे परिवार यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. 

तर सावंतवाडी सोनुर्ली येथील मुकुंद परब, कुडाळ सरंबळ येथील अभय कदम, देवगड येथील अनिल बांधकर, देवगड येथील मोहन मेस्त्री, दोडामार्ग येथील निलेश घाडी, कणकवली येथील आशुतोष ठाकूर, मालवण येथील दासू गोवेकर, वैभववाडी येथील राजाराम वळंजू, सावंतवाडी येथील अखिलेश कानसे, कुडाळ येथील मिलिंद परब यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झालेत. 

या विजेत्यांना 1 मार्चला सावंतवाडी - चराठा भोसले नॉलेज सिटी इथं सायं. 5. 30 वा. होणाऱ्या कोकणसाद LIVE च्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. विजेत्यांचं टीम कोकणसाद LIVE च्यावतीने अभिनंदन करण्यात आलंय.  


हे आहेत कोकणसाद LIVE गणेश सजावट स्पर्धेचे विजेते !

प्रथम क्रमांक : आनंद मेस्त्री ( मोपकर ), माणगाव - कुडाळ 

द्वितीय क्रमांक : रुपेश मळेकर, वेंगुर्ला कर्ली

तृतीय क्रमांक : साळुंखे परिवार, वैभववाडी 


उत्तेजनार्थ !

मुकुंद परब, सोनुर्ली - सावंतवाडी

अभय कदम, सरंबळ - कुडाळ 

अनिल बांधकर, देवगड

मोहन मेस्त्री, देवगड 

निलेश घाडी, दोडामार्ग 

आशुतोष ठाकूर, कणकवली 

दासू गोवेकर, मालवण

राजाराम वळंजू, वैभववाडी 

अखिलेश कानसे, सावंतवाडी 

मिलिंद परब, कुडाळ