सावंतवाडी : गेल्या दोन वर्षांपासून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणचे नंबर वन महाचॅनेल कोकणसाद लाईव्हने ३१ डिसेंबर रोजी रात्री रक्तदान शिबिराचे आयोजन करून अभिनव उपक्रम राबविला आहे. यंदाही सलग तिसऱ्या वर्षी नवीन वर्षाचे स्वागत कोकणसाद लाईव्ह व दैनिक कोकणसादच्या वतीने नववर्षाचे स्वागत रक्तदानाने करण्यात येणार आहे.
कोकणसाद लाईव्ह व युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून ३१ डिसेंबरच्या रात्री सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभेल व नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई रक्तदानाने करेल, असा आशावाद मुख्य संपादक सागर चव्हाण आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केला. रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी प्रा. रुपेश पाटील (मोबाईल क्रमांक ७९७२७७५४५९) वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
तसेच या रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी आपल्या तालुक्यातील आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा :
संदीप देसाई (दोडामार्ग): 9423321126, 9579662543
समीर सावंत (कणकवली -देवगड ): 7720096041, 9421191284
कृष्णा ढोलम (मालवण ) :7720096048, 9405870071
श्रीधर साळुंखे (वैभववाडी ): 7720096051, 9404166257
देवयानी वरसकर (सिंधुदुर्गनगरी ): 7720096046, 9561778686
विनायक गांवस (सावंतवाडी - बांदा ):7720096052, 9075119473
दीपेश परब (वेंगुर्ला) : 7774905036, 7666584062
भरत केसरकर (कुडाळ ) : 7720096045, 9423881120
उमेश बुचडे (कणकवली ) : 7038769080