
जिवात्मया आता सदगुरू ते कैसे !
नव्हती इतरां गुरू ऐसे !
जयाच्या कृपेने प्रकाशे! शुध्द ज्ञान !
जो ब्रम्हज्ञान उपदेशी ! अज्ञान अंधारे निरसी !
जिवात्मया परमात्म यासी ! ऐकता करी !!
समर्थ रामदासानी सांगितलेल्या या लक्षणांनी युक्त असलेल्या महान विभुतीलाच सदगुरू म्हणून संबोधले पाहिजे. ज्याच्या कृपेने शुध्द स्वरूप असलेल्या परमेश्वराचे ध्यान होते. जो ब्रम्हज्ञान देऊन अज्ञानरूपी अंध:कार नाहीसा करतो व जिवा शिवाचे ऐक्य प्रस्थापित करतो. ज्ञानाच्या आधारे जो संपूर्ण अविद्या व अज्ञान नाहीसे करून स्वरूपाची स्थिती दर्शवितो तो खरा सद््गुरू होय. अशा थोर योग्यतेचे प.पू. सद््गुरू गावडे काका महाराज होय.
अनेकांच्या ह्रदयातील श्रध्दास्थान, गुरूस्थान म्हणून काका पूज्यनिय आदरणीय आहेत, काकांचे नाव आदराने घेतले जात नाही असे भारतात एकही ठिकाण नाही. काकांच्या कार्यक्षेत्रावर प्रकाशझोत टाकायचा झाला तर कदाचीत शब्दही अपुरे पडतील. त्याच्या कार्यक्षेत्राची सुरूवात ही अध्यात्मिक क्षेत्रातून झालेली असली तरी त्यांनी त्याला अनेक पैलू पाडले आहेत. त्यामुळे अनेक बुध्दिजीवी, कष्टाळू ज्ञानी काकांच्या साधकांमध्ये आहेत. काका आपल्या कृतीतून समोरच्याला घडवत असतात. काकानी तरूण-तरूणीना व्यवसायात प्रावीण्य मिळवून दिले आहे. आजच्या तरूण पिढीलाही कमी कष्टात जास्त पैसा हवा असतो, परंतु कष्टाला पर्याय नाही याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्वत:च्या मुलाला सुजयला एक यशस्वी उद्योजक बनवून तरूणाईपुढे उदाहरण ठेवले आहे.
प्रसंगानुरूप मार्गदर्शन, तेजस्वी हास्यमुद्रा, लोभ, माया, गर्वाचा अंशही नसलेले काका म्हणजे आगळेवेगळे व्यक्तीमत्व आहे. त्याच्या सान्निध्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच जगात वावरते. काकांचे कार्यक्षेत्रातून अनेक ठिकाणी विखुरलेले आहे. अनेकाच्या हृदयातील श्रध्दास्थान गुरूस्थान म्हणून काका पूजनीय आहेत. काकांनी निसर्गोपचार तज्ज्ञ, रेकी मास्टर ही पदवी घेवून अनेकांना सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्री सद््गुरू गावडेकाका महाराज संस्थापित श्री सदगुरू भक्त सेवान्यास ही संस्था कॅन्सरग्रस्त रूग्णास मदत, निराधारांना आधार योजना, आपत्कालीन लोकांना तातडीची मदत, विद्यार्थी दत्तक योजना, योग व मेडिटेशन केंद्र लवकरच सुरू करून अनेकांना प्रशिक्षण, अनेक ठिकाणी योगावर्ग, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून रूग्णांची सेवा, १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मन ही एक अद््भूत शक्ती या कार्यक्रमातून मार्गदर्शन अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेऊन ही संस्था महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
गोव्याच्या देवभूमीत बेती येथे ऐतिहासिक अशा १०८ यज्ञ कुंडांच्या शिवमहायागाचे आयोजन करून श्री श्री १०८ महंत सद््गुरू श्री गावडे काका महाराजांनी इतिहास घडविला. गोव्यात लवकरच गावडेकाका़ंच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यासाचे माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंदिर प्रस्थापित होत आहे. अशा या महान सद््गुरूच्या चरणी समस्त भक्तगणांकडून कोटी कोटी प्रणाम!.....
- राकेश केसरकर