सावंतवाडी : सावंतवाडी परीसरात ब्लॅक पॅंथर दिसल्याची बातमी सोशल मिडीयावर सध्या जोरदार व्हायरल होतेय. या संदर्भात कोकणचे नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE नं फॅक्ट चेक केली.
सावंतवाडी परिसरात बिबटया विहीरीत पडल्याच्या बातम्या अनेकदा आपण पाहतो. मात्र कालपासुन अचानक ब्लॅक पॅथर या परिसरात असल्याची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याचा स्पष्ट फोटोही या पोस्टमध्ये दिसत आहे. दरम्यान, यासंदर्भात कोकणसाद लाईव्हनं फॅक्ट चेक केलीय. त्यातुन धक्कादायक माहिती समोर येतेय. हा बिबटया सावंतवाडी परीसरातला नाही तर तो केनिया या देशामधला आहे. तो ऑफ्रिकन ब्लॅक लिओपार्ड आहे. नॅशनल जिऑग्रिफीकवर यासंदर्भातील बातमी 13 फेब्रुवारी 2019 ला प्रकाशित झाली आहे. त्यामुळे ही बातमी फेक असल्याचे स्पष्ट आहे. नागरीकांनी अजिबात घाबरू नये आणि अशा पोस्टची जरूर खात्री करून फॉरवर्ड करावेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही.