'कोकणसाद LIVE' नं इनरव्हील महोत्सव पोहोचवला जगाच्या कानाकोपऱ्यात !

इनरव्हीलनं कोकणसाद LIVE चं मानलं खास आभार !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2022 18:03 PM
views 276  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद पुरस्कृत सावंतवाडीकरांच्या जिव्हाळ्याचा गुलाबी थंडीत होणारा पर्यटन महोत्सवाच वर्णन शब्दांत करता येणार नाही. परंतु, निवडणूक आचारसंहिता, कोरोना अन् आता प्रशासकाच राज्य यामुळे तब्बल तीन वर्षे सावंतवाडीकर या  महोत्सवापासून वंचित राहिलेत‌. याच तोडीस तोड असा संजू परब यांचा महोत्सव म्हणजे सावंतवाडीकरांसह जिल्हावासियांसाठी डबल धकामा असायचा. सुंदरवाडीच्या सुंदरतेत हे महोत्सव भर टाकायचे. परंतु, कोरोनामुळे मनोरंजनाची मेजवानी सावंतवाडीकरांच्या नशीबी नव्हती. यंदा ही मेजवानी सावंतवाडीकरांना देण्याचा विडा इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या महिलांनी उचलला. इनरव्हील महोत्सवाच शिवधनुष्य उचललं अन् पेललं देखील.

या महोत्सवाचे मिडिया पार्टनर कोकणचं नंबर 1 महचॅनल कोकणसाद LIVE नं इनरव्हील महोत्सवाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करत इनरव्हील महोत्सव जगभरात पोहचवला. देश-विदेशातील कोकणवासीयांनी हा कार्यक्रम कोकणसाद LIVE वर पाहिला. तीन दिवसांत गावागावातील लोकांसह जगाच्या कानाकोपऱ्यातील हजारो  दर्शकांनी हा महोत्सव पहिला व त्याचा आनंद घेतला. अगदी बोलक्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये दिल्या. कोकणसाद LIVE च्या युटूब चॅनलवर हा महोत्सव आपल्याला कधीही व केव्हाही पाहता येणार आहे. मिडीया पार्टनर कोकणसाद LIVE नं इनरव्हील महोत्सव थेट लाईव्ह प्रक्षेपण करत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवल्यानं मुख्य संपादक सागर चव्हाण यांचे इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, एडिटर डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी आभार मानले.