सावंतवाडी : पर्यटननगरी सावंतवाडीतील मनोरंजनाचा तब्बल तीन वर्षांचा बॅकलॉग पहिल्याच प्रयत्नात भरून काढणाऱ्या सावंतवाडी इनरव्हील महोत्सवानं सरत 2022 वर्ष यादगार केलय. महिला शक्तीनं उचलेलं हे शिवधनुष्य यशस्वी रित्या पेललय. तिन्ही दिवस या महोत्सवाला सावंतवाडीकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच खास आकर्षण असणारी 'इनरव्हील क्वीन' माधवी शहापुरकर ठरली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांची मन जिंकली. माजी नगराध्यक्षा अॅन. पल्लवी केसरकर यांनी या महोत्सवात उपस्थित राहत इनरव्हीलच्या महिलांना प्रोत्साहन दिल. तर पर्यटन महोत्सवासारखी भव्यता इनरव्हील महोत्सवानं कायम ठेवली अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केल. मिडीया पार्टनर कोकणच नंबर 1 महचॅनल कोकणसाद LIVE नं या महोत्सवाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करत जगभरात हा महोत्सव पोहोचवला. देश-विदेशातील कोकणवासियांसह हजारो दर्शकांनी हा महोत्सव घरबसल्या पहिला. धमाल, मस्ती अन् मनोरंजनाच्या मेजवानीनं रविवारी या महोत्सवाचा समारोप झाला.
एस एम मडकईकर सुवर्णकार यांच्याकडून एनरव्हील क्वीनला 1 ग्रॅम गोल्ड चेन देत सन्मान.
ऐतहासिक मोती तलावकाठी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान सावंतवाडी येथे हा महोत्सव पार पडला. कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करण्यात आल होत. सोलो डान्स, रेकॉर्ड डान्स, ग्रुप डान्स, कठपुतली शो, पारंपरिक फुगड्या, स्टॅच्यू स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला.समस्त सावंतवाडीकरांनी इनरव्हीलच्या महीलांच कौतुक केल. समारोपा दिवशी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला डिजिटल माध्यमातून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुभेच्छा देत असताना 'इनरव्हीलच्या उपक्रमाच खास कौतुक केल. पर्यटनस्थळी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असून यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा अस आवाहन त्यांनी केल. तर पर्यटन महोत्सव हा पुढील वर्षी निश्चित साजरा करू अस आश्वासन त्यांनी दिल. मात्र, यावर्षी सुद्धा इनरव्हीच्या भगिनींनी देखील तीचं भव्यता इनरव्हील महोत्सवानं कायम ठेवली अशा शब्दांत मंत्री केसरकर यांनी कौतुक केल. या दिवशीच खास आकर्षण ठरलं ती ''इनरव्हील क्वीन'' स्पर्धा. ३० ते ५० या वयोगटातील महिलांसाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. १८ जणींनी यात सहभाग घेतला होता. यात माधवी शहापुरकर हीन मानाचा इनरव्हील किताब पटकविला. तर कृतिका कोरगांवकर द्वितीय, सपना विरनोडकर तृतीय तर गौरी बांदेकर, प्रिती सावंत यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आल. कोल्हापुर येथील परीक्षकांनी या स्पर्धेच परीक्षण केल.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या माध्यमातून एनरव्हील क्वीनच्या प्रथम तीन क्रमांकांना सोन्याची नथ देण्यात आली.
या महोत्सवात झालेल्या विविध स्पर्धामध्ये स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात सॅलेड डेकोरेशनमध्ये प्रथम सीमा रेडीज, द्वितीय मेघा भोगटे, तृतीय श्रेया कासरलकर. पाककला स्पर्धेत आश्विनी दळवी प्रथम, द्वितीय मिना मडगावकर, तृतीय श्रेया शिरसाट तर उत्तेजनार्थ क्रमांकाचे प्राची पांगम, अदिती नाईक मानकरी ठरल्या. सोलो डान्स लहान गटात सोहम जांभोरे प्रथम, भक्ती सावंत द्वितीय, दुर्वा पावसकर तृतीय सोलो डान्स खुला गटातून समर्थ गवंडी प्रथम, नंदीता बिले द्वितीय, दिक्षा नाईक तृतीय क्रमांकांचे मानकरी ठरले. गृप डान्समध्ये चिमणी पाखरं गृप प्रथम तर गगन लेले गृपनं द्वितीय क्रमांक पटकवीला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आल.
म्युझिक कॉर्नरच्या माध्यमातून लकी ड्रॉ विजेत्यांना गौरविण्यात आल.
म्युझिक कॉर्नर सावंतवाडी पुरस्कृत 'लकी ड्रॉ' स्पर्धेत एक हजार जणांनी सहभाग घेतला. या कुपन्समधून पाच लकी कुपन्स काढण्यात आली. विजेत्यांना म्युझिक कॉर्नरचे मालक राजन हावळ, देवता हावळ यांच्याहस्ते गौरविण्यात आल. ''इनरव्हील क्वीन'' स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या माध्यमातून 'सोन्याची नथ' पुरस्कृत करण्यात आली होते. पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक अजित खैरे यांच्या हस्ते विजेत्यांना हि नथ सुपूर्द करण्यात आली. तर ''इनरव्हील क्वीन''साठी सावंतवाडीतील एस. एम. मडकईकर सुवर्णकार यांच्या माध्यमातून 1 ग्रम गोल्डची चेन पुरस्कृत करण्यात आली होती. विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर यांनी गोल्ड चेन देत इनरव्ही क्वीनला गौरविल. पल्लवी स्वार यांच्या माध्यमातून विजेत्यांना बक्षीस स्वरूपात साड्या देण्यात आल्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, आयएसओ देवता हावळ, एडिटर डॉ. सुमेधा नाईक- धुरी, डॉ. सुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी, मृणालीनी कशाळीकर, सोनाली खोर्जुवेकर, पूजा पोकळे, अनिता भाट, उषा परब, अन्नपूर्णा कोरगावकर, सायली दुभाषी,आदि उपस्थित होते.