सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक मताला अत्यंत महत्त्व असते. यासाठी मतदारांना खास वाहन व्यवस्था करून आणले जाते परंतु एक मतदार खास आपल्या आईला मत देण्यासाठी अमेरिकेतून आला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
चराठा ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच पदाच्या उमेदवार मारिता फर्नांडिस यांचा मुलगा आपल्या आईला मतदान करण्यासाठी थेट अमेरिकेतून आला. क्लाइव्हजो बावतीस फर्नांडिस असं या मुलाचं नाव आहे.