ब्युरो न्यूज : पुष्पा फेम स्टार रश्मिका मंदान्ना म्हणजेच चाहत्यांची लाडकी 'श्रीवल्ली' इंडस्ट्रीची गोल्डन गर्ल असून, देशभरात तिचे मोठ्या संखेने चाहते आहेत, यात शंकाच नाही. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर, रश्मिकाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी 'तेरी झलक अशरफी.. श्रीवल्ली' हे गाणे गाऊन त्यावर खास पोस्टर बनवले आहे.
'श्रीवल्ली' हे देवी लक्ष्मीचे दुसरे नाव असून, विविध गोल्ड ब्रँड्समध्ये देखील तिला साइन करण्यासाठी उत्सुक आहेत. अनेक मोठमोठ्या सोन्याच्या ब्रँड्समध्ये रश्मिकाला आपल्या जाहिरात आणि प्रमोशनचा चेहरा बनवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. 'पुष्पा - द राईज' या चित्रपटामुळे गेल्या ८ महिन्यांपासून रश्मिकाच्या 'श्रीवल्ली' या पात्राने देशभरातील दर्शकांना वेड लावले आहे. आणि याच कारणामुळे भारतीय गोल्ड ब्रँड्समध्ये अभिनेत्रीचे ब्रँड अपील खूप जास्त आहे.
गोल्डन गर्ल रश्मिकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे झाले तर, ती सध्या 'पुष्पा: द राइज'च्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहे. ज्यामध्ये ती अल्लू अर्जुनसोबत पुन्हा दिसणार असून, दर्शकांच्या आवडत्या 'श्रीवल्ली'ची भूमिका पुन्हा एकदा साकारताना दिसेल. तसेच, रश्मीकाच्या आगामी चित्रपटांमध्ये विजय थलापट्टीसोबत 'वारिसू' आणि रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' या चित्रपटांचा समावेश आहे.