दोडामार्ग :
साटेली भेडशी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत निधीतुन बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास अखेर शासनाला मुहूर्त मिळाला असून सोमवारी 26 फेब्रुवारीला सकाळी १०.१५ वाजता होणार आहे. याचदिवशी सावंवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेलीचे सुद्धा ११.१५ वाजता शालेय शिक्षणमंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित प्रमुख मान्यवर केंद्रिय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, वैभव नाईक, अनिकेत तटकरे, नितेश राणे, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अधिक्षक अभियंता दिपाली भाईक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अमर सोनवणे, कार्यकारी अभियंता, परिमंडळ ठाणे डॉ. प्रेमचंद कांबळे (कलकुटे), उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर, मंडळ कोल्हापूरया मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. महेश खलिपे व इंजि. आकाश फेरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दयानंद कांबळी,दोडामार्ग तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. रमेश कर्तसकर, सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. वर्षा शिरोडकर यांनी निमंत्रण पत्रिका काढून जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.
बाबूराव धुरी उद्धव बा. ठाकरे शिवसेनेच धरणे आंदोलन सुरच
साटेली-भेडशील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला प्रशासन व लोकप्रतिनिधी दिरंगाई करत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दहा दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच प्रशासनाला बाजूला ठेवत लोकार्पण केलं होतं. मात्र त्या ठिकाणी आरोग्य सेवा सुविधा सुरू न झाल्याने व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज सुरू होऊन रुग्ण सेवा मिळत नसल्याने त्याचं पुढचं पाऊल म्हणून बाबुराव धुरी व त्यांच्या शिवसेनेने प्रशासन रुग्णसेवा सुरू करत नाही त्यासाठी धरणे आंदोलन सुरू ठेवलं होतं. 26 पर्यंत प्रशासनाने ठोस निर्णय न दिल्यास स्थगित केलेलं बेमुदत उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने 26 फेब्रुवारी पर्यंत लोकार्पण करण्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्या शिवसेनेला दिलेल्या पत्रानुसार येत्या 26 फेब्रुवारीला शालेय शिक्षण मंत्री व या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रशासकीय लोकार्पण सोहळा निच्छित केला आहे. एकंदरीत शिवसेनेच्या आंदोलनामुळे साटेली भेडशीतील सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतून आता त्या भागातील जनतेला दर्जेदार रुग्णसेवा मिळणार आहे.
लोकार्पण प्रत्यक्ष की ऑनलाईन पद्धतीनं?
दरम्यान साटेली - भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नूतन इमारतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच धरणे आंदोलन सुरूच आहे. शिवाय मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा कोल्हापूर मुंबई दौऱ्यावर असल्याचं खात्रीदायक वृत्त आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेल्या रविवारच्या साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र च्या लोकार्पण सोहळ्यास मंत्री दीपक केसरकर हे स्वतःसाठी भेडशीत उपस्थित राहून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीमारतीचं लोकार्पण करणार? की दूरदृष्टी प्रणाली वरून ऑनलाईन पद्धतीने लोकांना हे पहाणे सुद्धा ओस्तुक्याचे ठरणार आहे.