सावंतवाडी : सावंतवाडीतील केसरी - अलाटी - धनगरवाडी येथील रहिवासी शांताराम लाख जंगले वगैरे चार भाऊ विभक्त कुटुंबासह राहत असून त्यांची रेशन कार्ड स्वतंत्र आहेत. वडील भूमीहीन असल्याने शासनाने त्यांना जामीन मंजूर करून दिली आहे. सदर कुटुंबीय आर्थिक मागास प्रवर्ग असल्याने त्यांना शासनाकडून आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजनेपैकी गायगोठा बांधणी अनुदान योजना राबविण्याकरता शांताराम लखु जंगले वैगेरे चार भाऊ यांनी संबंधित ग्रामपंचायतीत ग्रामसेवक यांची भेट घेतली.
कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी वडिलांचे संमत्तीपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. परंतु धोंडिराम जंगले, शांताराम जंगले यांनी त्यांच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली होती. परंतु वडील संमत्ती पत्र देत नसल्यामुळे आम्ही योजनेपासून वंचित राहिले. पर्यायाने आपला सामाजिक व आर्थिक विकास थांबला आहे तरी आपण यामध्ये तोडगा काढून संमत्ती पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे व शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे लेखी निवेदन धोंडिराम जंगले वैगेरे चार भाऊ यांनी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांना दिले आहे.
संबंधित प्रकरणी योग्य ती माहिती जाणून घेवून पीडित कुटुंबियांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी दिले आहे.