सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा , बक्षीस वितरण, प्रदर्शन उत्साहात

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पालकांची भरभरून दाद
Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2023 19:17 PM
views 558  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्था संचालित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये  मंगळवार ३ जानेवारी २० २३ रोजी केजी विभाग व इ. १ ली ते ४ थी वर्गाची वेशभूषा स्पर्धा , कला कार्यानुभव आणि विज्ञान प्रदर्शन तसेच वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

       

 सकाळी ९ .००वाजता प्रशालेत कला -कार्यानुभव प्रदर्शन वर्गाचे उदघाटन पंचम खेमराज महाविद्यालयाचे  प्राध्यापक योगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर  विज्ञान प्रदर्शन वर्गाचे उद्‌घाटन पंचम खेमराज विद्यालयाचे प्राध्यापक श्री .योगेश चौधरी  यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला  त्यांनी बनविलेल्या कला - कार्यानुभव विषयातील विविध वस्तूंना, चित्रकलेला, विज्ञान प्रदर्शनाला भरभरून दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

     तसेच केजी विभाग व इ . १ली ते ४ थी वर्गाच्या  वेशभूषा  स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. वेशभूषा स्पर्धेसाठी नर्सरी - फळे, ज्युनियर केजी - माझे ध्येय , सिनियर केजी -निसर्ग , इ .१ली - कारटून , इ. २ री - कारटून सूपरहिरोज , इ . ३री - समाजोपयोगी जीवन रक्षक , इ . ४ थी - विविध राज्यातील सांस्कृतिक वेशभूषा असे विषय संबंधित वर्गांना देण्यात आले होते .त्यानंतर प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .

         वेशभूषा स्पर्धेत केजी विभागातील नर्सरी वर्गातील कु . विघ्नेश साटेलकर - प्रथम , कु . वेद पवार -द्वितीय , कु. आरुष गुंड -तृतीय , कु. माहीरा खान -उत्तेजनार्थ, ज्यूनियर केजी मधील कु. जैनब शेख - प्रथम , कु . इसरा बेग - द्वितीय , कु . खदीजा शेख - तृतीय , कु . हुमेरा बांगी उत्तेजनार्थ , सिनीयर केजी मधील कु. माहीरा खान -प्रथम , कु . अबुतल्हा बागवान -द्वितीय , कु. कैफ शहा -द्वितीय , कु. अनस  बक्कर -तृतीय , कु सेहरीश बेग उत्तेजनार्थ आली. 

        तसेच इ. १ली तील कु . अल्फिया नेसर्गी - प्रथम , कु. ध्रुवा सावंत -द्वितीय , कु. जुनेरा मुल्ला - तृतीय आणि कु. तल्हा बक्कर , कु. युसरा खान व कु. मोहीनी शिरसाट हे विद्यार्थी  उत्तेजनार्थ आले. इ. २ तील कु . अनस शेंडेवाले - प्रथम , कु . साद बक्कर - द्वितीय , कु . जुहा शेख - तृतीय , कु. नोमान अन्सारी - उतेजनार्थ , इ . ३री तील कु. सबरीना शेख - प्रथम , कु .मोहम्मद अश्मान मकानदार  -द्वितीय , कु . सेहेर पटेल - तृतीय , कु. आयेशा बंगलेकर - उत्तेजनार्थ ,

 इ . ४ थी तील कु . आयान नेसर्गी - प्रथम , अथर्व निंबाळकर - द्वितीय , सना नेसर्गी - तृतीय , कु. युसरा शेख - उत्तेजनार्थ आली. वेशभूषा स्पर्धेचे परिक्षक म्हणून पंचम  खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीम. पुनम सावंत आणि सावंतवाडी मर्कझी  जमात बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम . निलोफर बेग यांनी काम पाहिले .

       विज्ञान प्रदर्शन इ . ५ वी ते ७ वी या गटात कु. फायजा बागवान - प्रथम , कु . साहिल नाईक - द्वितीय , कु . यश राऊळ - तृतीय , कु . दानिन अन्सारी व कु . सुवर्णा शेख -उत्तेजनार्थ आणि इ . ८ वी ते १०वी या गटात कु . रय्यान पटेल - प्रथम , कु . बरिराह  दुर्वेश - द्वितीय , कु. प्रविण सैनी -तृतीय , कु . मोहम्मद अशरफ सौदागर व कु . नाजमीन तडवी हे विद्यार्थी उत्तेजनार्थ आले . विज्ञान प्रदशर्नाचे परिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. योगेश पवार व श्री . योगेश चौधरी यांनी केले.  

       या कार्यक्रमाला सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सचिव श्री . हिदायतुल्ला खान , सहसचिव श्री सुलेमान बेग , सदस्य श्री . परवेज बेग , श्री . मुश्ताक बागवान ,पालक - शिक्षक संघ कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला 

हेशागोळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते .सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .