Career Guidance | मार्कशीटवर न मावणारी...पिशवीभर स्वप्नं !

करियर गाईडन्स, ॲडमिशन यासंदर्भात अत्यंत माहितीपूर्ण लेख
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 27, 2023 10:58 AM
views 543  views

जून हा वर्षातला फार विशेष महिना आहे. उन्हाच्या तडाख्यानंतरचा पहिला पाऊस आणि उन्हाळी सुट्टीनंतरची शाळा कॉलेजची लगबग यांच्या गडबडीत जूनचा पहिला पंधरवडा कसा निघून जातो, समजतही नाही हो.... आत्ताची गोष्ट वेगळी, पण फार लांब कशाला जायचं, अगदी वीस एक वर्षांपूर्वीचा एखादा जून महिना आठवून बघा.... कोसळणारा पाऊस, एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेलं मोठ्ठं एन्व्हलप, त्यातली जीवापाड अभ्यास करून मिळवलेली आपली सर्टिफिकेट्स, एका हातानं छत्री आणि दुसऱ्या हातानं ती पिशवी सावरत गर्दीतून कॉलेजकडे निघालेली पावलं..... डोळ्यांत नव्या आयुष्याची नवी स्वप्नं, आठवलं का?


रिझल्ट लागल्यावर आपसूकच धावपळ सुरु व्हायची ती बेस्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची.... कॉलेजेसच्या गेट्सवर फॉर्मसाठी भर पावसातही लाईन लागलेली असायची. प्रत्येकाच्या नजरेत काहीशी धाकधूक आणि बरीचशी उत्सुकता दिसायची. कॉलेजचा कट ऑफ किती मार्कांचा आहे, त्यात आपण किती पुढं किंवा मागे आहोत, आपलं नाव पहिल्या लिस्टमध्ये असेल की दुसऱ्या की तिसऱ्या, असे असंख्य प्रश्न डोक्यात भिरभिरत असायचे. हे सगळे प्रश्न डोक्यात वागवत त्या लाईनमध्ये उभं राहायचं. त्याबरोबरच घरी पालकांशी चर्चा व्हायच्या. त्यांचा सल्ला अर्थातच विचारता घेतला जायचा. एकदा फॉर्म्स भरून झाले की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन लिस्ट चेक करण्याचं काम असायचं. लिस्ट लागल्याचं कळताच हातातली सगळी कामं टाकून, ऊन, पाऊस, वारा, कसलीही पर्वा न करता कॉलेजकडे धाव घेतली जायची. आजही ते दिवस आठवले की छान वाटतं. खूप काही शिकवलं त्या दिवसांनी.....




हेच सगळं करत तेव्हाच्या पिढीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. काळ बदलला. करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. डॉक्टर, इंजिनिअर किंवा गेला बाजार काँप्युटर यापलिकडे जाऊनही अनेक नवीन कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. फक्त डिग्री नाही तर डिप्लोमापासून प्रायव्हेट युनिव्हार्सिटीजपर्यंत शिक्षणक्षेत्र विस्तारत गेलं आणि अर्थातच, वर सांगितलेली सगळी प्रोसेस आता हळूहळू मागे पडू लागली आहे.


ॲडमिशनप्लेक्स हे याच बदलत्या रूपाचं एक प्रतिक आहे. आता ते पाऊसपाण्याचं सर्टिफिकेट्स सांभाळत फिरणं आणि ते कॉलेजेसच्या वाऱ्या करणं मागे पडलंय. त्या सर्टिफिकेट्सचं मोल आम्ही जाणतो आणि म्हणूनच आत्ताच्या ओंनलाईनच्या काळात ते मोल टिकून राहाणं आम्हाला महत्वाचं वाटतं. पण मग ॲडमिशनचं काय? कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना....



ॲडमिशनप्लेक्समध्ये तुम्हाला हर तऱ्हेच्या कोर्सेसची माहिती मिळेल आणि फक्त माहिती नाही तर तुमच्या ॲडमिशनची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि लेटेस्ट पद्धतीनं पार पाडण्यासाठी आम्ही कायम तयार आहोत. त्याचप्रमाणे करियर गाईडन्स, तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या स्किलसेटनुसार तुम्हाला योग्य त्या ठिकाणी ॲडमिशन मिळण्यात मदत करणं, हेही आम्ही तुमच्यासाठी करतो. कारण आम्ही शिक्षणाचं मूल्य जाणतो. ॲडमिशनप्लेक्स आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.