सात वर्षांनी फुलली..गर्द जांभळी आंबोली !

पर्यटकांना खुणावतोय कारवीच्या फुलाचा बहर !
Edited by: जुईली पांगम
Published on: October 25, 2022 18:06 PM
views 332  views

सावंतवाडी : आंबोलीची गोठवणारी थंडी, फेसाळणारा धबधबा.. केवळ एवढंच आंबोलीच वर्णन होऊ शकत नाही. याव्यतिरिक्त आंबोली ओळखली जाते ती समृद्ध जैवविविधतेसाठी...सध्या आंबोलीत जांभळ्या निळ्या रंगाने सजलीय. आंबोलीत जर गेलात तर हे सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल.


निळी जांभळी ही कारवीची फुलं...या बहरलेल्या फुलांनी आंबोलीच्या सौदर्यात आणखीनच भर पाडलीय... आंबोलीच्या मुख्य धबधब्यापासून पूर्वीचा वस मंदिरापर्यंतच्या घाटात दुतर्फा तुम्हाला ही फुल सध्या पाहायला मिळतील. या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे 7 वर्षानंतर ही एकदाच फुलं फुलतात. २०१५ मध्ये फुललेली ही फुलं आता २०२२ मध्ये फुललीत. स्थानिक भाषेत ही फुलं कारावं किंवा कारवी या नावाने ओळखली जातात. वनस्पतीचे वैज्ञानिक नाव ‘स्ट्रोबीलेन्थस केंलोसस’ किंवा ‘कार्विया कॅलोसा’ आहे.  सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते ऑक्टोबर महिना असा ही फुलं फुलण्याचा कालावधी असतो. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते आणि इतिहासाचे प्राध्यापक राजेंद्र केरकर यांनी 'कोकणसाद'ला अधिक माहिती दिली.   


जेवढी ही फुल सुंदर आहेत तेवढेच ती बहुउपयोगी आहेत. कारवीच्या फुलांपासून तयार होणारे मध बहुउपयोगी औषधी व फार महाग असते. प्रामुख्याने त्याचा उपयोग शरीरातील रक्तवृद्धीसाठी होतो. शिवाय या झाडांची पान आणि फुल गळून पडल्यावर कारवीच्या खोडांचा उपयोग कुडाच्या भिंती व छप्पर बनविण्यासाठीही केला जातो. या फुलांपासून वाईन बनवण्यासंदर्भातही संशोधन सुरू आहे. अशा या फुलांचा आंबोलीत खास महोत्सवही भरला होता. 

सध्या हि कारविची मनमोहक फुलं लक्ष वेधून घेतायत. निसर्गप्रेमींसाठी हा जणू अनमोल खजिनाच...प्रत्यक्षात ही फुल पाहण, सौंदर्य साठवण्याच सुख हे निराळच...पण तुम्ही अजूनही ही फुलं पहिली नसतील तर आताच आंबोली गाठा...नाही तर ही फुल पाहण्यासाठी 2029 उजाडण्याची वाट पाहावी लागेल...