बाप रे, चिकन चिल्ली 600, दहीभात 450, इसवण 3,500 | कुठलं आहे हे रेटकार्ड?

पर्यटकांची गर्दी आणि खाद्यपदार्थांचे पाचपट दर
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 03, 2023 12:55 PM
views 1571  views

पणजी : देशाची पर्यटन राजधानी समजल्या जाणा-या गोव्यात पर्यटकांची सध्या तोबा गर्दी आहे. या तोबा गर्दीवर मात्र तिथले काही हॉटेल व्यावसायिक तुटून पडल्याचं चित्र आहे. या पर्यटकांची गर्दी पाहता खाद्यपदार्थांचे दर पाचपटीनं वाढवण्यात आले असुन पर्यटकांची अक्षरशा लुट चालु आहे.  


एकीकडे पर्यटन खात पर्यटनातील अवैध धंद्यांवर कारवाई करत आहे. मात्र, दुसरीकडे किनारी भागातील रॉकमध्ये पर्यटकांची लूट सुरूच आहे. कळंगुट येथील एका रॉकमध्ये फ्राईड राईसची किंमत तब्बल २५० रुपये तर लॉबस्टर पाळीची किंमत ४,५०० रुपये इतकी वाढीव आहे. तसेच मद्य व अन्य खाद्यपदार्थांचे दरही तिप्पट होते. हंगामात थोडी दरवाढ ठीक आहे; मात्र अशा पद्धतीने टूट केल्यास पर्यटक पुन्हा येथे येतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


गेले काही दिवस उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट, बागा किनारी असणाऱ्या शेकमधील दर गगनाला भिडले आहेत. १५० रुपयांना मिळणारे चिकन चिली, गोबी मंच्युरिअन ५०० ते ६०० रुपयांना विकण्यात येत आहे. साधारण १३० रुपयांपर्यंत मिळणारे व्हेज सेजवान राईसची किंमत ९९० रुपये होती. मिक्स पुलाव ९००, दहीभात ४५०, पनीर भाजी ५५० रुपयांना विकली जात होती. याशिवाय अस्सल गोमंतकीय माशांचे जेवणही सामान्य ग्राहकाला परवडणारे नव्हते इसवर्ण पाळीचा दर ३ ते ३५०० हजर रुपये होता. दरम्यान, अशा पध्दतीनं लुट होत राहीली तर येत्या काही दिवसात पर्यटक गोव्याकडं पाठ फिरवण्याची शक्यता आहे.