दोडामार्ग:
गेले तीन चार दिवस महावितरणाला कोणतीही कल्पना न देता वीज सेवा परस्पर बंद करण्याऱ्या महा ई नेट सुविधा पुरविणाऱ्या कंत्रादारांकडून होत असलेल्या मनमानीला शिवसेनेच्या दोडामार्ग येथील डशिंग उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी चाफ लावला आहे.
हम करे सो कायदा या अविर्भात सर्व नियम धाब्यावर बसवून तो ठेकेदार आपल्या मर्जीने चालत होता. याबाबत धुरी यांनी एम एस ई बी चे साटेली भेडशीचे सहाय्यक अभियंता मोरे यांच्याबरोबर संपर्क करून हा प्रकार उघडकीस आणला आहे.
सध्याच्या घडीला दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत, त्यात कडक उन्हाळा अशा प्रकारच्या उष्णतेला सर्व जनता सामोरी जात आहे. त्यात महा नेट जोडणीच्या नावाखाली महा नेट जोडणी करणारा त्या ठेकेदारांच्या मनमानीमुळे सर्वांचे हाल होत आहेत. त्यामुळे आपले काम उरकण्यासाठी ठेकेदार करत असलेली मनमानी थांबली पाहिजे. कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित होता कामा नये, अशा ठेकेदारावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली आहे.