मुसळधार पावसालाही झोपवून उभं राहिलं अंकुर सीडस्चं 'श्री 101' भातपीक !

नेरूरपारमध्ये प्रत्यक्ष पीक पाहणी व शेतकरी मेळाव्याला उदंड प्रतिसाद !
Edited by: संदीप देसाई
Published on: October 30, 2022 19:44 PM
views 652  views

कुडाळ : मुसळधार अवकाळी पावसानं अवघ्या कोकणातलं भाताचं पीक झोपवलं. परंतु असं असलं तरी भात बियाणे उत्पादनात अग्रेसर असलेल्या अंकुर सीड्स भाताच्या 'श्री 101' या भात पीकानं मात्र या पावसालाही झोपवलय. नागपूरच्या अंकुर सीड्स कंपनीचं हे भात बियाण हे संकट भेदूनही आज शेतकरी राजाच्या पाठीशी डौलानं उभा आहे. अंकुर सीड्स कंपनीने आयोजित केलेल्या पीक पाहणीनंतर शेतकरी बांधवांनीही भात श्री 101 बियाण्याला पहिली पसंती दिलीय.


रविवारी नेरूर येथे जिल्ह्यातील अंकुर सिड्स प्रा. लि. च्या भात बियाण्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृत विक्रेते वैभव प्रभू व अंकुर सीड्सने यावर्षी शेतात प्रत्यक्ष वाण लागवडीनंतर आलेलं पीक पाहण्यासाठी पीक पाहणी व थेट शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उदघाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती रणजित देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून अंकुर सीड्स कंपनीचे विक्री प्रतिनिधी उत्तम संकपाळ, कृषी सहाय्यक श्रीपाद चव्हाण, प्रभू एजन्सीचे मालक वैभव प्रभू, लागवड धारक शेतकरी सुभाष नाईक, देवस्थान समितीचे मानकरी प्रदीप नाईक, जगदीश नाईक, माजी प.स. सदस्य संदेश नाईक, अवधूत प्रभू, सिद्देश कुंभार, विलास नाईक, सूर्यकांत परब, आळवे,  प्रगतशील शेतकरी प्रभाकर नाईक, सूर्यकांत परब, जयराम परब, राजन कापडोस्कर, अजय राऊत, जितेंद्र परब आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री-१०१ हे बियाणे नागपुरच्या अंकुर सीडस कंपनीचं. याचा सिंधुदुर्ग जिल्हयात प्रसार झाला तो कुडाळच्या प्रभु एजन्सीमार्फत. या भात बियाण्याचं प्रत्यक्ष पीक पाहण्यासाठी आज खास पीक पाहणी कार्यक्रमाचं आयोजन कंपनी व प्रभु एजन्सीनं केलं होतं. प्रत्यक्ष पाहणीनंतर मात्र अनेक शेतकरी बांधवांचं मन जिंकण्यात हे बियाणं यशस्वी ठरलं. अगदी लहान दाणेदार लोंबी, मजबुत काडी आणि भरघोस उत्पादन देणा-या या श्री 101 बियाण्याला सर्वांनीच पहिली पसंती दिलीय.  श्री 101 या भात बियाणाची गुणवत्ता दाखवण्यासाठी खास पीक पाहणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उल्लेखनीय कार्य करणा-या शेतकरी बांधवांचा यावेळी शेती विषयातले जाणकार नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या भात बियाणाची माहिती देण्यात आली. तसेच शेतकरी बांधवांनीही आपले अनुभव मांडले. 

यावेळी कंपनीचे अधिकारी उत्तम संकपाळ यांनी अंकुर सीड्सच्या  श्री-१०१ वाणाची  शेतकऱ्यांना सविस्तर महिती दिली. अतिशय बारीक, सुपर फाईन, सर्वोत्कृष्ट वाण असल्याचे सांगितले. अतिवृष्टीत सर्व भात झोपलीत, मात्र श्री 101 भात पडणे, झडणे नाही, एका लोम्बीला सरासरी 350 दाणे, एक एकर 20 ते 22 क्विंटल भात उत्पादन देणारे हे बियाणे असल्याचे ते म्हणाले. कोकणातल्या शेतकरी बांधवांचं मुख्य पीक हे भात असत, कोकणावर निसर्गाची अवकृपा होत असल्यामुळं अनेकदा हे पीक हातातुन जातं. शेतकरी बांधव पुन्हा हताश होतात. अगदी याही वर्षी आलेल्या पावसाच्या संकटात अनेकांच्या हातचं पीक गेलं. मोठं नुकसान झालं. अशा स्थितीत काही शेतकरी बांधवांची भात शेती मात्र या पावसाला झोपवुन मोठया डौलात उभी आहे, हे भात बियाणं अंकुर श्री 101 ने करून दाखवल्याने त्यांनी सांगितले. रणजित देसाई यांनी सुद्धा गेल्या दोन वर्षात हे वाण कंपनीनं विकसित केले असून आज शेतकऱ्यांना ते वरदान ठरत असल्याचे सांगितले. सुरवातीला आम्ही 500 किलो बियाणे शेतकऱ्यांना सर्वप्रथम वितरित केले होते. मात्र यावर्षी 10 ते 12 टन बियाणे शेतकऱ्यांनी उचल केल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आपलं नुकसान टाळण्यासाठी बाजारात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञान व बियाण्याचा अभ्यास करून शेती करावी असा कानमंत्र त्यांनी दिला.
 
यावेळी प्रगतशील शेतकरी व अंकुर श्री-१०१ भातपिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. 
 
अनेक कंपन्या अनेक दावे करतात, मात्र नागपुरच्या अंकुर सीडसनं आधी आपल्या या बियाण्याची गुणवत्ता सिध्द करून दाखवली आणि मगच ते शेतकरी बांधवांसमोर आणलं आहे.