दोडामार्ग: 'एकच मिशन, जुनी पेन्शन,” “अरे ओ शाशक हो होश मे आओ, होश मे आकर बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नही देंगे तो लढ के लेंगे हमारे हक, भुलो मत - भुलो मत…! ओ मेरे भैय्या.. इस शासन पर हल्ला बोल. असा इशारा देत कर्मचारी एकजुटीचा विजय असोचा मोठा एल्गार दोडामार्ग तालुक्यातील १२ कर्मचारी संघटनांनी ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ ची घोषणा देत एक जुटीने धरणे आंदोलन करत सरकारला ठणकावले आहे.
दोडामार्ग पंचायत समिति कार्यालयासमोर या १२ संघटनचे प्रतींनिधी एकवटत त्यांनी हे शक्ति प्रदर्शन केले आहे. सरकार कडे तिजोरी भरलेली असताना सरकार जाणीव पूर्वक कर्माचार्यांकचा हक्क देण्यास दुट्टपी भूमिका घेत आहे. जुनी पेन्शन योजना हा आमचा हक्क आहे. ज्या महाराष्ट्र राज्याला प्रगत महाराष्ट्र बनविण्यात कर्मचारी यांचं योगदान सरकारने जाणले पाहिजे. मात्र आपली मागणी सरकार पुरी कर्त नसेल तर आपला लढा अजून १५ दिवस सुरू राहिला पाहीजे अशी भावना व्यक्त केली आहे. दोडामार्ग तालूक्यातील महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, जिल्हा परिषद चालक-परिचर संघटना, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना (DNE-136) शाखा दोडामार्ग, महाराष्ट्र राज्य कृषी तांत्रिक संघटना, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना या १२ शासकीय कर्मचारी संघटनांचे कर्मचारी संप व धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.