देवगड बीचवर कासव तर कुणकेश्वर बीचवर डॉल्फिन मासा सापडला मृतावस्थेत

वनविभागाच्या देण्यात आले ताब्यात
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 19, 2023 09:06 AM
views 236  views

देवगड : देवगड बीचवर कासव तर कुणकेश्वर बीचवर डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला. किरण पांचाळ व कल्याणी पांचाळ या दोघांना शुक्रवारी बीचवर मॉर्निंग वॉक करत असताना एक मृत कासव दिसले. त्यांनी याबाबत तारामुंबरी येथील कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण तारी यांना कळविल्यानंतर तारी यांनी वनविभागाचे वनरक्षक निलेश साठे यांना बोलावून मृतअवस्थेत व अर्धवट कुजलेल्या स्थितीत असलेल्या कासवाला दान केले. यावेळी पांचाळ दांपत्य, ओंकार तारी व स्थानिक उपस्थित होते.

त्याचबरोबर शनिवारी कुणकेश्वर येथील ग्रामस्थ व इतिहास संशोधन मंडळाचे रणजित हिर्लेकर यांना सकाळी ७.३० वा.सुमारास कुणकेश्वर बीचवर मृतावस्थेत कुजलेल्या स्थितीत डॉल्फिन मासा आढळला. त्यांनीही लक्ष्मण तारी यांना कळविल्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनरक्षक निलेश साठे यांनी कुणकेश्वर ग्रामपंचायतील कळविले. यावेळी कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी यांनी घटनास्थळी त्यांचे सफाई कर्मचारी अमित सावंत यांना बोलावून मृत डॉल्फिन माशाला दान केले. साधारण साडेसहा फुट लांबीचा हा मासा होता.