सिंधुदुर्ग : परूळे शेळपी येथील रहिवासी अमोल दिगंबर परब (वय 26) या युवकाला आतड्याचा कॅन्सर झाला आहे. त्याच्यावर कणकवली येथील नागवेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. परंतु, त्या युवकाची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितल आहे. या युवकाच्या घरची परिस्थिती बेताची आहे. पुढील उपचारासाठी आवश्यक पैशांची कमतरता आहे. या युवकाला वेळीच मदत मिळाल्यास जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर लोकांनी या युवकाला जीवनदान देण्यासाठी हातभार लावावा, अस आवाहन त्यांच्या मित्रपरिवारासह कोकणच नं. १ महाचॅनेल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून करण्यात आल आहे. या युवकाला मदत करण्यासाठी 7875493925 या नंबरवर संपर्क साधावा.