२७ नोव्हेंबर कणकवली वरवडे येथे महाआरोग्य शिबिर

सोनू सावंत मित्र मंडळाचे आयोजन हृदयरोग, सर्जन , ऑर्थोविभाग, स्त्रीरोग, बालरोग ,नेत्र, त्वचा , दंत तज्ञ डॉक्टर राहणार उपस्थित
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 25, 2022 13:20 PM
views 351  views

कणकवली : सध्याच्या धावपळीत व धकाधकीच्या जीवनात माणसांनी  आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठीच सोनू सावंत मित्र मंडळ वरवडे यांच्या माध्यमातून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी 08 ते दुपारी 01 या वेळेमध्ये आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या महाआरोग्य शिबिराचे उदघाटन डॉ सविता तायशेटे यांच्या हस्ते होनार असून या शिबीरासाठी  प्रमुख उपस्थिति अतिरिक्त शल्य चिकित्सक सिंधदुर्ग  डॉ श्रीपद पाटील हे उपस्थिति राहणार आहेत. 

या शिबिरात

हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग = डॉक्टर सूर्यकांत तायशेटे, डॉ बी जी शेळके, डॉ राम मेनन.

सर्जरी विभाग = डॉक्टर विद्याधर तायशेटे, डॉक्टर संदीप सावंत डॉक्टर महेंद्र आचरेकर .

ऑर्थो विभाग = डॉक्टर निलेश पाकळे, डॉक्टर शरण चव्हाण.

स्त्री रोग विभाग= डॉक्टर ए आर नागवेकर, डॉक्टर सौ अश्विनी नेवरे, डॉक्टर सौ.आचरेकर, डॉक्टर विशाखा पाटील.

बालरोग विभाग = डॉक्टर प्रशांत मोघे, डॉक्टर नितीन शेट्ये, डॉक्टर आदित्य शेळके.

नेत्र विभाग = डॉक्टर प्रसाद गुरव, डॉक्टर राकेश बोरकर.

कान नाक घसा विभाग = डॉक्टर श्रीपाद पाटील, डॉक्टर सौ प्रीता नायगावकर, डॉक्टर ओंकार वेदक.

दंतरोग विभाग = डॉक्टर स्वप्नील राणे, डॉक्टर धैर्यशील राणे.

तसेच  या शिबिरात रक्त तपासणी रक्तदाब पल्स एचबी युरीन संबंधित टेस्ट तसेच ईसीजी सुद्धा मोफत काढून मिळणार आहे या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सोनू सावंत मित्र मंडळ वरवडे यांनी केले आहे