JOBS ! JOBS !! JOBS !!! भव्य रोजगार मेळाव्यात 24 कंपन्यांचा सहभाग 

गुरुवार, 5 जानेवारी रोजी सावंतवाडीत रोजगार मेळावा 
Edited by: भरत केसरकर
Published on: January 02, 2023 19:04 PM
views 846  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी 'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' या कंपन्यांनी संयुक्तरित्या गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. या रोजगार मेळाव्यात 'आजच मुलाखत; आजच निवड' या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल. 

   या रोजगार मिळाव्यात एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.   

या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या ससंधी उपलब्ध होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.