कणकवली : कणकवली, कळसुली, दिंडवणेवाडीतील सौ. विशाखा विवेकानंद सावंत यांच्या (पारंपरिक फुगडी गीते, लग्न गीते,ओव्या) 'संगोपन' या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन ललित लेखक आणि थोर विचारवंत महेश काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कवी उदय केशव सर्फे, सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते कळसुली दिंडवणेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थित झाले.
फुगडी, लग्न गीते, ओव्या म्हणजे भारतीय पवित्र संकृतीची जोपासना असून "संगोपन" या गीत संग्रहाने त्याची जोपासना केली असल्याचे उद्गार महेश काणेकर यांनी काढले.
जेष्ठ कवी उदय सर्फे यांनी कवियत्री सौ. विशाखा सावंत यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांनी आपल्या कविता सादरीकरण करुन सर्वाना मंत्र मुग्ध केले. कवियत्री सौ. विशाखा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच फुगडी गीत म्हणून दाखविले,
दिंडवणेवाडितील जेष्ठ निवृत्त प्राथमिक शिक्षक जयवंत विष्णू कुळकर्णी यांनी कवियत्रीचे कौतुक केले, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात कणकवली येथील प्रकाश कदम, कामत सृष्टी रहिवासी आचरेकर, सुभाष जनार्दन कदम (निवृत्त रेल्वे अधिकारी), सौ. गुलाब हरड या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वंभर विवेकानंद सावंत यानी कले.
सावंत कुटुंबियांनी सर्व जेष्ठ मान्यवरांचे शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. आभार प्रदर्शन विश्वंभर सावंत यांनी केले.