वेंगुर्ले तालुक्यात “कार्यकर्ता संवाद मेळावा” | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती

Edited by: दिपेश परब
Published on: April 12, 2024 14:04 PM
views 104  views

वेंगुर्ले : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघात “कार्यकर्ता संवाद मेळावा” उद्या १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी मतदारसंघ निवडणूक प्रमुख राजन तेली यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ सकाळी १०: ३० वाजता जि.प. म्हापण शरयु मंगल कार्यालय, पाट,  दुपारी १२: ३० वाजता जि.प.आडेली गोगटे मंगल कार्यालय, वेतोरे, त्यानंतर संध्याकाळी ३: ३० वाजता जि.प. उभादांडा सातेरी मंगल कार्यालय अणसूर, तिठा, संध्याकाळी ५:०० वाजता जि.प. तुळस उत्सव मंगल कार्यालय आणि संध्याकाळी ६:३० वाजता जि.प. रेडी मतदार संघाचा मेळावा माऊली मंगल कार्यालय, शिरोडा येथे होणार आहे.