
सावंतवाडी : स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात अधिकारी घडवणारी विश्वासार्ह संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या ‘महेंद्रा अकॅडमी’तर्फे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आणि क्रिएटिव्हिटीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एका विशेष ‘रील स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. “अधिकारी बनण्याचं स्वप्न... आता रीलमधून जगासमोर!” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी दिली आहे.
अकॅडमीचे अभ्यासपूर्ण वातावरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी विद्यार्थ्यांचा संघर्ष आणि अधिकारी घडवण्याची परंपरा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेसाठी "महेंद्रा अकॅडमी - अधिकारी घडवणारी फॅक्टरी" ही मुख्य थीम ठेवण्यात आली असून, स्पर्धक खालील विषयांवर आपली रील तयार करू शकतात. अधिकारी होण्याचं स्वप्न आणि संघर्षातून मिळालेले यश, महेंद्रा अकॅडमीची वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण पद्धती व विद्यार्थ्यांचे अनुभव, स्पर्धा परीक्षा तयारी, मोटिव्हेशन आणि सक्सेस जर्नी, अकॅडमीचे वातावरण, डिजिटल क्लासरूम, अभ्यासिका आणि शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा अकॅडमीवरील विश्वास आणि "आजचा विद्यार्थी... उद्याचा अधिकारी" हा प्रवास ही आहेत.
स्पर्धेतील उत्कृष्ट रील धारकांना प्रथम बक्षीस १०,०००/- रोख आणि सन्मानपत्र, द्वितीय बक्षीस ₹५,०००/- रोख आणि सन्मानपत्र, तृतीय बक्षीस ₹२,०००/- रोख आणि सन्मानपत्र मिळणार आहे. रीलचा वेळ ६० सेकंद ते १ मिनिट ५० सेकंदाच्या आत असावा, व्हिडिओ HD Quality मध्ये असावा आणि रीलमध्ये "Mahendra's Academy" हे नाव स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. आशय मूळ असावा. कोणताही अश्लील, राजकीय किंवा आक्षेपार्ह मजकूर नसावा. तयार केलेली रील Instagram किंवा Facebook Reels वर अपलोड करायची आहे रील पोस्ट करताना #MahendrasAcademy, #OfficerBanaycha, #ReelCompetition, #FutureOfficer, #MPSC, #UPSC, #SuccessJourney, #StudyMotivation या अधिकृत हॅशटॅगचा वापर करणे बंधनकारक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख २० मे २०२६ असून, केवळ प्रथम येणाऱ्या ५० स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभाग दिला जाणार आहे. स्पर्धेचा मुख्य कालावधी २१ मे ते ५ जून २०२६ असा राहील. ''आजची रील... उद्याचं करिअर !" असे आवाहन करत अकॅडमीने विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी महेंद्र पेडणेकर (९०२२६८६९४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.










