
सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल आणि दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'समर स्पोर्ट इन्व्हिटेशनल जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूर्णपणे रात्रौ खेळवली जाणार असून संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी हे एक मोठे आकर्षण ठरणार आहे.
हि स्पर्धा दिनांक ५ ,६ , आणि ७ जून २०२६ रोजी होणार आहे . स्पर्धेचा उद्घाटन व सामना सुरवात शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता होणार आहे. हि स्पर्धा संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे (आरॉस तिठा), तालुका- सावंतवाडी.या ठिकाणी होणार आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना आणि खेळाडूंना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रथम पारितोषिक ₹ १५, ००० तसेच भव्य चषक,द्वितीय पारितोषिक ₹ १०,००० तसेच भव्य चषक,वैयक्तिक बक्षिस बेस्ट स्मॅशर, बेस्ट लिबेरो आणि बेस्ट प्लेयर ऑफ द सीजन यांना विशेष ट्रॉफी देण्यात येईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क ₹ १,०००/- प्रति संघ असणार आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख ४ जून २०२६ असणार आहे
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी शाळा संपर्क क्रमांक 8459067721,अधिक माहिती व संघ नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भाग घेण्यासाठी अजय बांदेकर - 9096624211, ओम नाईक - 9359881989, हर्षद दिचोलकर - 9689382547, याच्याशी संपर्क साधवा,स्पाइक इट, ब्लॉक इट, विन इट' या ब्रीदवाक्यासह होणाऱ्या या चुरशीच्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी व आपल्या लाडक्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार नॅशनल स्कूल निरवडे परिवारातर्फे करण्यात आले आहे.










