जि. प. - पं. स. आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द

21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 14, 2025 19:59 PM
views 47  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेश क्रमांक-साशा/डेस्क-1(4),जिपपंस / प्रापर,2025 दिनांक 14 जुलै 2025 च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत (शासन राजपत्र,अनुसुची 5अ व 5ब) प्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील फलकावर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील फलकावर, तहसिलदार वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर तसेच पंचायत समिती वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर लावण्यात आली आहे. 

उक्त मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दिनांक 14 जुलै 2025 नंतर विचारात घेण्यात येईल. आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना संबधित तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे दिनांक 21 जुलै 2025 रोजी पर्यंत सादर करावेत. उपरोक्त तारखेनंतर तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.