
सावंतवाडी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यानुभव कार्यक्रम या उपक्रमासाठी जुलै अखेर निरवडे ता.सावंतवाडी येथे आगमन झाले होते.सदर विद्यार्थी हे मागिल महिन्याभरात शेतीविषयक ज्ञानाचे शेतकरी वर्गा सोबत देवाणघेवाण करत आहेत 26 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निरवडे नं.१ येथे परस बागेचे नियोजन करून परस बाग तयार करण्यात आली.परस बाग तयार करताना मुळदे येथील विद्यार्थ्यांसोबत निरवडे प्राथमिक शाळेचे १ली ते ७ वी पर्यंत सर्व विध्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी झाले होते.* तयार करणयात आलेल्या *परस बाग लागवडीमध्ये भोपळा, गवार,भेंडी,दोडका,वाल, काकडी, दुधी व इत्यादी प्रकारच्या भाज्यांचा समावेश आहे.या मातीचे विविध आकारात योग्य असे मातीचे वाफे तयार करण्यात आले.
परस बाग या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निरवडे नं.१ चे मुख्याध्यापक सौ.स्मिता पाटकर मॅडम,तसेच शिक्षिका सौ.अर्पिता राणे मॅडम,सौ युगंधरा सावंत मॅडम, सौ.प्रज्ञा राऊळ मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर ग्रुप मधील विध्यार्थी हे *उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत.
या उपक्रमात *कु.राजस कदम, सुयश काळे, रामचंद्र वारंग,ओमकार उंबरकर,अमन नवल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सदर परसबाग उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सौ. स्मिता पाटकर मॅडम,निरवडे शाळा नं.१ची व्यवस्थापन कमिटी,निरवडे गावचे सरपंच सौ.सुहानी गावडे आणि उपसरपंच श्री.अर्जुन पेडणेकर,तसेच निरवडे ग्रामस्थांनी उद्यानविद्या महाविद्याय,मुळदे मधील विद्यार्थांच्या कामाचे खूप कौतुक केले.