झरेबांबर-आंबेलीला आदर्श गाव बनवायचंय म्हणून सरपंचपदाच्या रिंगणात..!

अनिल शेटकर यांच्या अभ्यासू नेतृत्वाची चुणूक प्रचार फेरीतच अधोरेखित
Edited by: संदीप देसाई
Published on: December 13, 2022 15:19 PM
views 347  views

दोडामार्ग : गाव करील ते राव काय करील अशी एक म्हण आहे, आणि ती तंतोतंत लागू पडते ती, पंचायत राज विकासात. महाराष्ट्रात हिवरे बाजार, राळेगणसिद्धी पाटोदा या गावांनी ते करून दाखविले. पण हे सगळं करून दाखविण्यासाठी सक्षम नेतृत्व पण तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच आज पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार, अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी आणि भास्कर पेरे पाटील यांच पाटोदा गाव म्हणून ओळखले जाते. या तिन्ही गावांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत. आणि आज याच गावांची त्यांनी ग्रामविकासात केलेल्या सर्वोच्च कामांची महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात चर्चा आहे. अगदी लांबरवच कशाला आपल्या तालुक्यात सरपंच संदीप देसाई, प्रेमानंद देसाई, प्रवीण परब यांनी केलेलं काम सर्वपरिचित आहे. प्रेमानंद देसाई यांनी केलेल्या उत्तुंग कामांमुळे दोडामार्ग तालुक्यातील केर गाव संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आदर्श गाव तर संदीप देसाई यांनी केलेल्या कामामुळे त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला नंबर घेत दोडामार्ग तालुक्याचा दबदबा निर्माण केला, आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत, तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार, लोकराज्यग्राम पुरस्कार, नव्हे तर पंचायत राज मधील प्रत्येक अभियानात पुरस्कार पटकाविले. अगदी तोच धागा पकडून आम्ही गेली २० वर्षे समाजकारणात वावरत असताना या अनुभवाच्या शिदोरीवर आमच्या झारेबांबर-आंबेली ग्रामपंचायतला सुद्धा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे नियोजनबद्ध स्वप्न पाहिले आहे. म्हणूनच आजच्या होणाऱ्या थेट सरपंच निवडणूक मध्ये तितकच खंबीर नेतृत्व गावाच्या प्रथम स्थानी असावं असंही आम्हांला वाटत आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला अगदी हृदयापासून आवाहन करतोय, एक वेळ संधी द्या आणि पुढील पाच वर्षात आपल्या सर्वांच्या थोरा मोठाच्या आणि जेष्ठ गावकरी मंडळींच्या मार्गदर्शन आशीर्वादाने आपला झरेबांबर-आंबेली हा आदर्श गाव झालेला पहा. आम्ही यापुर्वी ही गावासाठी झटून काम केलं आहे आणि आपण संधी दिल्यास यापुढे सुद्धा गावचा प्रथम नागरिक सरपंच मालक म्हणून नव्हे तर  एक सच्चा सेवक म्हणून यापुढेही आम्ही काम करणार आहोत, यासाठीच आपल्या गावच्या उज्वल भवितव्यासाठी माझ्यासारख्या सच्चा व प्रामाणिक लोकसेवकास संधी द्या, असे आवाहन झरेबांबर-आंबेली गावच्या निवडणूकितील थेट सरपंच पदाचे उमेदवार अनिल शेटकर यांनी केलंय.

   आपण केवळ राजकारण म्हणून गावच्या सरपंच पदाची निवडणूक लढवत नाहीय, आज गावच्या ग्रामपंचायत आणि सरपंच पदाला खूप महत्व आणि तितकीच जबाबदारी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणूनच माझ्या गावासाठी सुद्धा मला प्रामाणिक काम करायचंय म्हणून मी या निवडणुकिला सामोरे जात असल्याचे श्री. शेटकर आवर्जुन सांगतात.

खरं तर आज राजकारण ही एक पॅशन झालेली आहे. जी राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी वाडी वस्त्यांवर नव्हे तर घराघरात पोहवचली आहे. एकाच घरात चार चार राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांच्याही घरी हेच की कोणता झेंडा घेऊ हाती? आणि याचे दूरगामी परिणाम गावच्या निवडणूकित होत आहेत. लोकशाहीत ग्राम पातळीवर निवडणूक मध्ये राजकीय चिन्ह वापरण्यात येत नाही त्यामागचे मूळ कारण खरे तर आजच्या युवाईन आणि राजकारणात एकमेकांशी गाव स्तरावर भांडणाऱ्या लोकांनी करायला हवा. जी व्यक्ती आपलं गावचं नेतृत्व करण्यास सक्षम आहे, ज्या व्यक्तीला प्रशासकीय ज्ञान आहे, गावाविषयी जाण आणि  गावच्या मूलभूत गरजांचा अभ्यास असलेली व्यक्ती आहे? थेट सरपंच म्हणून निवडून आल्यावर ती व्यक्ती गावासाठी वेळ देईल का, गावच्या सर्वांगीण विकासासाठी झटेल का? याच मूल्यमापन करूनच योग्य तो उमेदवार आपल्या गावचा प्रथम नागरिक म्हणून निवडून देणें योग्य आहे. आणि आज खऱ्या अर्थाने गावकरी मंडळी या गोष्टींचा विचार करताना दिसत आहेत.  

  असाच एक झरेबांबर-आंबेली गावच्या ग्रामपंचायत निवडणूक साठी सक्षम उमेदवार थेट सरपंच पदाच्या निवडणूकित उतरला आहे. ज्याचं नाव आहे अनिल शेटकर.गेली २० वर्षे सक्रिय समाजकारण आणि जोडीला राजकारण असे सामाजिक कार्यात अनिल शेटकर यांचा वावर आहे. यापूर्वी ५ वर्षे ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून सुद्धा त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली आहे. त्यामुळे मुळात त्यांना ग्रामपंचायत प्रशासकीय ज्ञान आहे. तालुका व जिल्हा पातळीवर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी दांडगा संपर्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्यक्तीत गावासाठी झटून काम करण्याची जिद्द आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देईल असा ठाम विश्वास अनिल शेटकर यांना आहे. याच व्यक्तीने आपल्या गावात वाडी वस्त्यांवर स्ट्रीट लाईट पोहचविण्यासाठी घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. इतकंच नव्हे तर या गावचं प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून श्री ब्रह्मणेश्वर मंदिर विकसित करण्यात सुद्धा तितकाच वाटा आहे. गावातील नळयोजना जी आज घरोघरी पाणीपुरवठा करते त्यासाठी ३० लाखांहून अधिक निधी मिळवून आणण्यासाठी शेटकर यांचाच सहभाग आहे. गावातील सार्वजनिक विहिरी दुरुस्ती व नव्याने बांधणी नव्हे तर गावचे बहू उद्देशीय सभागृह उभारण्यासाठी सुद्धा शेटकर यांनी योगदान दिल आहे. आज विकासाचा अजेंठा गावकऱ्यांसमोर ठेवताना अनिल शेटकर आवर्जून सांगतात रस्ते, पाणी व वीज या गरजा तर सातत्यपूर्ण असतीलच. पण जो गाव अण्णां हजारे यांनी बनवला, पोपटराव पवार यांनी बनवला, भास्कर पेरे पाटील ज्यांनी तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवत गावाला सर्वोच्च शिखरावर नेलं, अगदी त्याच सचोटीने आम्हांला काम करायचय. 

  यासाठी सुरवातीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान गावात प्रभावीपणे राबवून स्वच्छ व सुंदर गाव, त्यांनतर स्मार्ट गाव बनविण्यासाठी आम्हांला गावकरी यांच्या सहभागाने, गावातील प्रत्येक वाडी वस्तीतील, जेष्ठ व सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या युवा वर्गाला, महिला वर्गाला सोबत घेत अफाट काम करायचं आहे. हे करत असताना गावात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी लघु उद्योग, शैक्षणिक विकासासाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग, सामाजिक एकता व सामाजिक सण उत्सव करिता एकता व धार्मिक महोत्सव, सांस्कृतिक व्यासपीठ देण्यासाठी उपक्रम व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उप आरोग्य केंद्र बळकटीकरण, महिला सक्षमीकरण साठी बचतगट चळवळ व महिला उद्योग उभारणे, इतकंच नव्हे तर गावातील मुलांसाठी व्यायामशाळा, वाचनालय या गोष्टी आपण करणार आहे. खास करून गावात शासकीय जमीन मुबलक असल्याने गावातील मुलांसाठी हक्काचं क्रीडांगण उभारण्यासाठी आपल प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. पाणलोट सारखा मोठा प्रकल्प गावात सुरू असल्याने त्या अंतर्गत जी कोट्यवधीची विकासकामे प्रस्तावित आहेत यात झरेबांबर आणि आंबेली दोन्ही ठिकाणी ही कामे प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचं शेटकर यांच्याकडे परफेक्ट प्लॅनिंग आहे. तर तिलारी चे पाणी सुद्धा गावात आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी आपण कृषी विभाग व शासनाच्या विविधांगी योजना गावात आणण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. एकूणच स्वच्छ, सुंदर, स्मार्ट व आदर्श गावाचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही एक राजकारणी म्हणून नाही तर लोकसेवक म्हणून काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, सामाजिक कार्य हाच आमचा मूळ पिंड असल्याने गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी गावकरी व मतदार निश्चित आम्हांला साथ देतील, आमच्या विविध प्रभागात उभ्या असलेल्या सदस्यांना सुद्धा भरघोस मतांनी निवडून देतील असा ठाम विश्वास अनिल शेटकर यांनी व्यक्त केला आहे.