
दोडामार्ग:गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या आणि उसाप, पिकुळे, खोक्रल, मांगेली या दोडामार्ग तालुक्याला जोडणाऱ्या झरेबांबर येथील कमी उंचीच्या कॉजवेच्या ठिकाणी मंजूर झालेल्या पुलाचे शिवसेनेचे उपतालुकाप्रमूख तिलकांचन गवस यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले.
यावेळी झरेबांबरचे सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच शाम नाईक, पो. पाटील चंद्रशेखर सावंत, माजी सरपंच स्नेहा गवस, माजी उपसरपंच काशिनाथ शेटकर, तंटा मुक्ती अध्यक्ष दादा पालयेकर, ग्रा. प. सदस्य संजना आजरेकर, नीता नाईक, पिकुळे सरपंच आपा गवस, उपसरपंच निलेश गवस, राजेंद्र निंबाळकर, संदीप गवस, सखाराम गवस, चंद्रकात जाधव, नीळकंठ गवस, धाकू गवस, चंद्रकत नाईक, धुरी, सुधीर तर्पे, सुप्रिया तर्पे, मोहिनी माजीक, रुचिका घाडी, करण शेटकर, आत्माराम जाधव आदी उपस्थित होते. अगदीच कमी उंचीच्या असलेल्या हा कॉजवे सातत्याने पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने तेथून पलीकडे असलेल्या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटायचा. आपत्कालीन परिस्थितीत तालुक्यात येण्यासाठी नागरिकांची गैरसोय व्हायची. यासाठी स्वतः तीलकांचंन गवस यसंह शिवसेनेचे कार्यकर्ते झरेबांबर, पिकुळू येथील सरपंच व ग्रामस्थ सारेच मोठ्या पुलाची मागणी करत होते. विद्यमान सरपंच अनील शेटकर व माजी सरपंच स्नेहा गवस यांनीही या पुलासाठी जलसमाधीचा प्रशासनाला इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान शालेय शिक्षण मंत्री यांनी या पुलासाठी आवश्यक निधी शिंदे सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याने आता या पुलाचे भूमिपूजन होत असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा तीलकांचन गवस यांनी व्यक्त केलीय. सरपंच शेटकर यांनीही मंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.