युवराज लखमराजे भोंसले - युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंचा खास सन्मान

Edited by:
Published on: December 13, 2024 19:12 PM
views 266  views

सावंतवाडी : ट्रॅव्हल अधिक लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४  हा अवार्ड सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. पाककलेचा हा परंपरागत वारसा यापुढेही जपणार असल्याचे प्रतिपादन युवराज, युवराज्ञींनी सत्कार स्वीकारताना केले.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानमध्ये आजही परंपरागत चालत आलेल्या पाककृती जपल्या जात आहेत. राजेशाही मेजवानीतील हे पदार्थ आजही येथे बनविले जातात. युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी ऐतिहासिक राजवाडा येथे 'सावंतवाडी पॅलेस द बुटिक आर्ट हॉटेल' सुरू केलं आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वारसा, परंपरा जपत असताना खाद्य संस्कृतीतील वारसा देखील त्यांनी कायम ठेवला आहे.

देशी- विदेशी पर्यटकांना येथे राजेशाही पारंपरिक खाद्यपदार्थ येथे चाखण्याची संधी मिळते. ट्रॅव्हल अधिक लीझर या संस्थेने यांची दखल घेऊन भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४  हा अवार्ड त्यांना प्रदान केला. युवराज व युवराज्ञी हे स्वतः उत्कृष्ट दर्जाचे शेफ आहेत. दिल्ली येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाककलेचा हा परंपरागत वारसा यापुढेही जपणार असल्याचे प्रतिपादन युवराज, युवराज्ञींनी करत सन्मानासाठी आभार व्यक्त केले.