
सावंतवाडी : माळगाव इंग्लिश स्कूल येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगांव व तालुक्यातील महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये यांच्या सहकार्याने शाळा,कॉलेज ते शेती बांध हा उपक्रम राबविण्यात आला.
तालुक्यातील शाळा,कॉलेजचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. माळगाव इंग्लिश स्कूल येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगांव व तालुक्यातील महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळा,कॉलेज ते शेती बांध याचा शुभारंभ संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली ग्रामविकास मंडळ अध्यक्ष प्रा. गोडकर, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, माजगांव सरपंच अर्चना सावंत, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय सावंत, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ज्येष्ठ नागरिक संघटाचे अण्णा देसाई ,गुरुनाथ पेडणेकर आदि यावेळी उपस्थितीत होते. त्यानंतर शेती प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी युवराज लखमराजे भोंसले यांनी स्वतः शेतात उतरत नांगरणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना भात लावणीच प्रात्यक्षिक देण्यात आल.