युवासेनेचा कॉलेज कक्ष स्थापनेचा बोर्ड चोरीला..? | सागर नाणोसकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Edited by:
Published on: September 13, 2023 18:54 PM
views 115  views

सावंतवाडी : ११ सप्टेंबर रोजी कॉलेज मधील युवकांच्या प्रश्नांना कुठे तरी ज्ञाय मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि खासदार विनायकजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 ठिकाणी कॉलेज कक्ष ची स्थापना करण्यात आली होती, आणि याचे बोर्ड कोणत्याही कॉलेजच्या मालकिच्या परीसरात न लावता अधिकृत परवानगी घेऊन नगरपंचायत हद्दीत लावण्यात आले होते. पण सुसंस्कृत असलेल्या आपल्या सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालय येथील कॉलेज कक्ष स्थापनेचा बोर्ड चोरण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. महाविद्यालयातील मुलांचे विद्यापीठाचे किंवा अन्य प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन केलेला हा उपक्रम कोणाच्या जिव्हारी लागला असा प्रश्न युवकांच्या समोर पडला आहे.

तसेच स्वतः मुलांच्या प्रश्नांवर दुर्लक्षित करावे आणि युवासेनेच्या या उपक्रमाचे कौतूक न करता केलेल्या कार्याचे बोर्ड चोरण्यात विरोधकांना आनंद वाटत असल्याचे दिसत आहे. रील प्रकार हा निंदनीय आणि खेदास्पद आहे या प्रकाराची चौकशी नक्कीच केली जाईल असे युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर नाणोसकर यांच्या वतीने बोलण्यात येत आहे.