
सिंधुदुर्ग : रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तीन महिन्यातच रस्ता वाहून गेल्यामुळे संतप्त कुंभवडे ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता आणि बांधकाम विभागाला निवेदन देण्यातआलं.
प्र. जि. मा. २२ कनेडी सुभाषनगर ते कुंभवडे मुख्यरस्त्याचे डांबरीकरण गेल्या मार्चमध्येच पूर्ण करण्यात आले आणि आज हा रस्ता पूर्णपणे उकडून गेलेला आहे निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळेच हा रस्ता वाहून गेल्याचा आरोप युवा सेना पदाधिकाऱ्याने केलेला आहे.. सद्यस्थितीत पूर्ण रस्ता उखडून गेल्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून रस्त्यावरील डांबर, थर, खडी रस्त्यावर विखुरली आहे.
त्यामुळे त्या रस्त्यावरुन रोज शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, गावातील ग्रामस्थ यांची ये-जा करताना व वाहतूक करताना अपघात होवू शकतो त्यामुळे पंधरा दिवसाच्या आत रस्त्यावर आलेली खडी, डांबर थर योग्य ती उपाययोजना करुन रस्ता व्यवस्थित करावा, हा रस्ता केलेल्या ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि पीडब्ल्यूडी चे जे अधिकाऱ्यारी रस्त्याचे काम चेक करून रस्ता ओके असल्याचे खात्री करतात आणि बिल काढतात त्यांच्यावरही कारवाई व्हावी असे निवेदन कार्य करी अभियंता आणि बंधकामविभागला दिले आहे तसेच. पुढे येणारा गणपती सण असल्यामुळे हा रस्ता पंधरा दिवसाच्या आत सुस्थितीत न केल्यास सोळाव्या दिवशी शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने दिला आहे. यावेळी. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना तालुका समन्वयक गुरुनाथ पेडणेकर ,ग्राम.प. सदस्य संदीप सावंत, उपशाखाप्रमुख, म्याथीव डिसोजा ,माजी सरपंच आप्पा तावडे,युवा सेना शाखाप्रमुख चेतन गुरव, पंकज तावडे ,युवा सेना समन्वयक तेजस राणे उपशहर प्रमुख प्रतीक रासम उपस्थित होते